निशान-ए-मजरुह पुरस्काराचे वितरण; नऊ साहित्यिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:35+5:302021-01-04T04:13:35+5:30
जळगाव : मजरुह अकादमीतर्फे रविवारी (दि. ३) नऊ उर्दू कवींचा गौरव निशान-ए-मजरुह हा पुरस्कार देऊन करण्यात आला. हा सोहळा ...
जळगाव : मजरुह अकादमीतर्फे रविवारी (दि. ३) नऊ उर्दू कवींचा गौरव निशान-ए-मजरुह हा पुरस्कार देऊन करण्यात आला. हा सोहळा रविवारी रात्री कांताई सभागृहात पार पडला.
अध्यक्षस्थानी इकराचे अब्दुल करीम सालार होते, तर उद्घाटन मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख उपस्थित होते. व्यासपीठावर औरंगाबादचे डॉ. दोस्त मोहम्मद खान, जळगावचे बंगाली असोसिएशनचे महेंद्र माहिटी व मजरुह अकादमीचे अध्यक्ष डॉ. शाफिक नाजीम उपस्थित होते.
सर्वप्रथम हाफिज मुश्ताक यांनी कुराण पठण केले. फारुक शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मजरुहचे अध्यक्ष डॉ. शफिक नाजिम यांनी प्रास्ताविक केले.
पुरस्कारार्थी - यांचा झाला सत्कार
कय्युम राज (मारुड), चरागोद्दिन चराग, ताज मोहम्मद ताज व शयूर आशना (बऱ्हाणपूर ), माइल पालधवी (सुरत), सईद जिलानी, अखलाक निजानी, काजी जमीर अशरफ, शकील अंजूम (जळगाव).
पुरस्कार वितरणानंतर मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नऊ पुरस्कारार्थींनी गझल आणि शायरी सादर केली. यशस्वीतेसाठी मजरुह अकादमीचे शफिक नाजिम, रशीद पिंजारी, काजी रफिक, बाबा मलिक यांनी परिश्रम घेतले.