जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात ९५० सनदांचे वाटप, मोहिमेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 09:08 PM2024-01-30T21:08:28+5:302024-01-30T21:08:42+5:30

भूषण श्रीखंडे/ जळगाव : महास्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील ...

Distribution of 950 sanad in two days in Jalgaon district, campaign started | जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात ९५० सनदांचे वाटप, मोहिमेला सुरुवात

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात ९५० सनदांचे वाटप, मोहिमेला सुरुवात

भूषण श्रीखंडे/जळगाव: महास्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सनद वाटप करून मोहिमेला सुरुवात झाली. दोन दिवसात जिल्ह्यात गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून यातून ३ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कलाबाई चिंतामण कोळी, कमलबाई रमेश गायकवाड व शिवलाल गिरमा सोनवणे या शेतकऱ्यांना सनद वाटप करून मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाने जिल्ह्यात सनद वाटप मोहीम राबविली. स्वामीत्व योजनेंतर्गत गावठाण सर्व्हे झालेल्या जळगाव जिल्ह्यातील गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून ३ लाख ९५ हजार २८८ रुपयांची सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

जीआयएस प्रणालीवर मालमत्ता पत्र तयार केले जाणार

स्वामित्व योजनेत जळगाव जिल्हयातील सर्व गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यातील सर्वेक्षणातून नागरिकांना सनद वाटप केली जात असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम. पी. मगर यांनी दिली.

या तालुक्यांमध्ये सनद वाटप
रावेर तालुक्यातील मौजे पिंपरी, पाडले खु., निरूळ, पाडले बु., नेहते, बोरखेडा, मोरगांव खु, चोरवड, कोळोदे, मांगी या गावात ३२९ सनदचे वाटप १ लाख ५२ हजार ४३३ रुपये सनद फी वसूल झाली. जळगाव तालुक्यातील मौजे देवगाव, मोहाडी, खेडी खु, पळसोद, वसंतवाडी, आवार, गाढोदे, आमोदे बु, या गावात २४८ सनद वाटप व ९७ हजार ८० रुपये सनद फी वसूल, पारोळा तालुक्यातील मौजे सोके, हिरापूर, सावखेडे तुर्क, कन्हेरे, मेहु, नेरपाट, सावखेडे होळ, चहुत्रे खोलसर, बाहुटे, या गावांमध्ये २२६ सनद वाटप व ८७ हजार २६० रुपये सनद फी वसूल, यावल तालुक्यातील मौजे पथराळे, हरिपुरा, करंजी, भोरटेक, भालशिव, पिंपरी, गिरडगाव, भालशिव या गावात ११२ सनद वाटप आणि ४३ हजार ५७० रुपये सनद फी वसूल झाली. पाचोरा तालुक्यातील मौजे हडसन, कोकडी, वडगाव जोगे, वडगाव आंबे खु, या गावात ३५ सनद वाटप व १४ हजार ९४५ रुपये सनद फी वसूल झाली आहे.

 

 

Web Title: Distribution of 950 sanad in two days in Jalgaon district, campaign started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.