सोनबर्डी येथे आदिवासी बांधवांना रेशनकार्ड व दाखले वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:29+5:302021-09-10T04:24:29+5:30
एरंडोल : शासन आपले दारी महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील सोनबर्डी येथे आदिवासी समाज बांधवांना रेशनकार्ड व दाखले वाटप करण्यात आले. ...
एरंडोल : शासन आपले दारी महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील सोनबर्डी येथे आदिवासी समाज बांधवांना रेशनकार्ड व दाखले वाटप करण्यात आले.
या वेळी १२ गावांतील ४८० रेशनकार्ड तसेच २० जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी आमदार चिमणराव पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी आदिवासी टायगर सेना जिल्हाध्यक्ष भूषण दादा भिल, जिल्हा परिषद सदस्य मंगलसिंग गायकवाड, सचिव पंढरीनाथ मोरे, आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते, रेशन दुकानदार संघटना उपाध्यक्ष राजू वंजारी, पुरवठा विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर राजपूत, संदीप निळे, नंदकिशोर वाघ आदी उपस्थित होते. सोनबर्डी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पी. जी. पाटील, अधीक्षक गवई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.