आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:52 PM2020-11-22T14:52:41+5:302020-11-22T14:54:07+5:30

राजस्व अभियानांतर्गत २१ रोजी तालुक्यातील मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.

Distribution of ration cards to tribal families | आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप

आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप

Next
ठळक मुद्देअमळनेर : महसूल विभाग, आदिवासी एकता संघर्ष समितीचे प्रयत्न मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप

अमळनेर : येथे राजस्व अभियानांतर्गत २१ रोजी तालुक्यातील मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात बेरोजगारी आणि आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. आदिवासी कुटुंबे यामुळे बेरोजगार झाले आहेत. या अनुषंगाने राज्य शासनाने सर्व आदिवासी कष्टकरी व शेतकरी शेतमजुरांना २ रुपये किलो दराने धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्व आवश्यक लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
खावटी योजनेसाठी आवश्यक असलेले महत्वाचे कागदपत्र म्हणजे शिधापत्रिका आहे. बहुतेक आदिवासिंकडे शिधापत्रिका नसल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व आदिवासी कुटुंबाना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने महसूल विभाग आणि आदिवासी एकता संघर्ष समितीतर्फे पहिल्या टप्प्यात अनेक गावांना रेशनकार्ड अर्ज मोफत वाटप करण्यात आले.
या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मारवड, गोवर्धन व बोरगाव येथील आदिवासी कुटूंबाना रेशनकार्ड वाटप तहसीलदार वाघ, प्रा. दाभाडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जवळपास ३०० ते ४०० रेशनकार्ड वाटप झाले आहेत. यात रुबजीनगर, खेडी व्यवहारदळे,रामेश्वर खुर्द रामेश्वर बुद्रूक या गावांचा समावेश आहे.
यावेळी महसूल विभागाचे बावणे, ना. गो. पाटील, मारवाडचे उपसरपंच बी. डी. पाटील, वि. का.सोसायटीचे चेअरमन शांताराम चौधरी, डॉ विलास पाटील,नरेंद्र पाटील, तलाठी भावसार, अनिल पवार, अनिल साळुंखे, निंबा साळुंखे, सुभाष पाटील, धनराज पारधी, अनिल पारधी, मनोज पवार, पूनमचंद पारधी, श्रीकांत साळुंखे व गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते.
 

Web Title: Distribution of ration cards to tribal families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.