नाबार्डद्वारे आयोजित महिला बचतगटांना सॅनिटरी नॅपकीन सयंत्र वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:38+5:302021-01-23T04:16:38+5:30
जळगाव : नाबार्डच्या सॅनिटरी नॅपकीनच्या पायलट प्रोजेक्टसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त जळगाव जनता सहकारी बँकेची निवड करण्यात आली. या ...
जळगाव : नाबार्डच्या सॅनिटरी नॅपकीनच्या पायलट प्रोजेक्टसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त जळगाव जनता सहकारी बँकेची निवड करण्यात आली. या प्रोजेक्टसाठी जळगाव जनता सहकारी बँकेचा झाशीची राणी महिला बचतगट निवडण्यात आला. सॅनिटरी नॅपकीनच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्व मशिनरी जळगाव शहरात दाखल झाली असून, या उत्पादनास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते झाले. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) जिल्ह्याचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालतील निवासी दंतरोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा वानखेडे, स्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली भिरुड, जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक कृष्णा कामाठे, संचालिका डॉ. आरती हुजूरबाजार, सावित्री सोळुंखे, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी उपस्थित होते. उपस्थितांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप संचालक कृष्णा कामठे यांनी केला. सूत्रसंचालन बँकेच्या अधिकारी स्वाती भावसार यांनी केले.
साडी व लेडीज कुर्तीज सेलला प्रतिसाद
फोटो क्रमांक २३ सीटीआर ४२
जळगाव : प्रभात चौकातील डॉ. शानभाग सभागृहातील साजी व लेडिज ब्रॅण्डेड कुर्तीज सेलला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. पार्टीवेअर, सुरत येथील मिलमधील साड्या तसेच लेडीज ब्रॅण्डेड कुर्तीज वर्ल्स टॉपचा सेल सुरू आहे. यात प्रिंटेट प्युअर बांधणी साडी, शिफॉन साडी, सण्डे मण्डे साडी, टिश्यू सिल्क साडी आदीप्रकारच्या हजारो रंगातील साड्या उपलब्ध आहेत. कुठलीही साडी १०० रुपयात उपलब्ध आहेत. लेडिज ब्रॅण्डेड कुर्तीजमध्ये साऊथ कॉटन प्रिंटेट कुर्ती, अहमदाबाद कॉटन कुर्ती आदी प्रकारच्या कुर्ती तसेच अल्ट्रा मॉडर्न टॉप, फोटो प्रिंट डिझाईर टॉप उपलब्ध आहेत. सेल पुढील दोन दिवस शनिवार व रविवारी सकाळी १० ते ९ या वेळेत सुरू राहणार असून, लाभ घेण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे.