माहेश्वरी महिला मंडळाकडून ४५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:35 PM2019-07-18T18:35:18+5:302019-07-18T18:36:30+5:30
जळगाव - शहरातील माहेश्वरी महिला मंडळातर्फे बुधवारी बालाजी पेठेतील माहेश्वरी महिला मंडळ संचलित बालविहार येथील ४५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ...
जळगाव- शहरातील माहेश्वरी महिला मंडळातर्फे बुधवारी बालाजी पेठेतील माहेश्वरी महिला मंडळ संचलित बालविहार येथील ४५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्या म्हणून विद्या कोगटा यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून बालविहारातील सर्वच गोरगरिब व गरजु विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, पेन्सिल, वॉटर बॅग, जेवणाचा डबा तसेच गणवेश मोफत देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ शालेय साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद झळकून आला होता.
कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्षा स्रेहलता लाठी, सुमती नवाल, उषा राठी, नर्मदबाई कोगटा, मंगला सोमाणी यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.