धरणगावात गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 04:07 PM2019-07-06T16:07:32+5:302019-07-06T16:08:47+5:30
धरणगाव येथील मुन्नादेवी अॅण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चंदेल यांच्या पुण्यस्मरणार्थ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटण्यात आले.
धरणगाव, जि.जळगाव : येथील मुन्नादेवी अॅण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चंदेल यांच्या पुण्यस्मरणार्थ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटण्यात आले. येथील राजपूत समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक जीवनसिंह बयस हे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे, कडूसिंह बयस, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सी.के. पाटील, उपनगराध्यक्षा अंजली विसावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, पत्रकार भरत चौधरी, उद्योजक नयन गुजराथी, नीलेश चौधरी, भुराजी बयस गोविंदसिग, शिवसेना संघटक धीरेंद्र्र पुरभे, गटनेते कैलास माळी, जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक शरदकुमार बन्सी, विनोद रोकडे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शहरातील पी.आर., बालकवी, इंदिरा गांधी, म.फुले, आदर्श विद्यालय, उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गावातील एकूण १५ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी फाउंडेशनने घेतली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे, भरतकुमार चौधरी, गटनेते कैलास माळी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त गुण संपादन करावे, असे म्हटले यावेळी भरत चौधरी, भाजप गटनेते कैलास माळी, आर.बी.पाटील, पी.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जीवन बयस यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक जितेंद्र बयस यांनी केले. सूत्रसंचालन गणेशसिंह सूर्यवंशी यांनी, तर आभार धींरेंद्र पुरभे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाली बयस, यशपाल चंदेल, संकेत चंदेल, मोहनिश चंदेल, पंकज बयस, जितू बयस, हर्षल बयस यांनी परिश्रम घेतले.