शिंपी समाजातील गरजूंना बांधवांना शिलाई मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:25+5:302021-06-09T04:21:25+5:30
अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक रेल्वे गाड्या जळगाव : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अहमदाबाद- हावडा दरम्यान ...
अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक रेल्वे गाड्या
जळगाव : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अहमदाबाद- हावडा दरम्यान पूर्णतः आरक्षित आणि अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना जळगाव रेल्वे स्टेशनवरही थांबा देण्यात आला आहे. तसेच या गाड्यांमध्ये तिकिट कन्फर्म असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तरी अधिक माहितीसाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी गुरुवारी शिवाजीनगर उड्डाणपुलाची पाहणी करणार
जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपूलाचे संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी १० जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी गुप्ता यांना उपोषण न करण्याचे सांगत, आपण स्वतः या कामाकडे लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी हे शिवाजीनगर उड्डाणपुलाची पाहणी करणार आहेत.
जळके गावातील ९० टक्के लसीकरण पूर्ण
जळगाव : तालुक्यातील जळके ग्रामपंचायती तर्फे गावात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गावातील नागरिक भीती न बाळगता लसीकरण करत आहेत. या गावातील पहिला डोस नव्वद टक्के नागरिकांनी घेतला असून, दुसरा डोस तीस टक्के नागरिकांनी घेतला आहे. गावात लसीकरण कॅम्प राबविण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या गावात कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येणार
जळगाव : मुंबई-दिल्ली दरम्यान धावणारी राजधानी एक्स्प्रेस ११ जून पासून आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येणार आहे. दर शुक्रवार, शनिवार, मंगळवार व बुधवारी ही गाडी चालविली जाणार आहे. तसेच ही गाडी तिच्या पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार धावणार आहे. या मुळे दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे सोयीचे झाले आहे. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.