टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:26+5:302021-05-01T04:15:26+5:30
जळगाव : आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार टॉसिलीझुमॅब हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित ...
जळगाव : आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार टॉसिलीझुमॅब हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शासकीय किंवा खाजगी रुग्णालयास वाटप करण्याबाबतचे निर्देश खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या सुचनांचे पालन करणे जिल्ह्यातील सर्व मेडिकल डिलर्स, विक्रेते यांना बंधनकारक राहणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते टॉसिलीझुमॅबचा साठा प्राप्त झाल्यास त्यांनी त्याची माहिती जिल्हाधिकारी व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय जळगाव यांना द्यावी, असे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, व विक्रेते यांना जिल्हाधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचे वितरण किरकोळ मेडीकल विक्रेते यांना करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.