एसीबीच्या गुन्ह्यात दोषसिध्दीत जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:46 AM2019-11-01T11:46:51+5:302019-11-01T11:47:47+5:30

राज्यात तिसऱ्या स्थानी : सहा केसेसमध्ये आठ जणांना शिक्षा; दोन वर्षात अडकले ५७ सरकारी बाबू

 District 1 guilty of ACB crime | एसीबीच्या गुन्ह्यात दोषसिध्दीत जिल्हा प्रथम

एसीबीच्या गुन्ह्यात दोषसिध्दीत जिल्हा प्रथम

Next


सुनील पाटील ।
जळगाव : भ्रष्टाचाराच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमध्ये नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक शिक्षा जळगाव जिल्ह्याच्या गुन्ह्यात सुनावण्यात आल्या असून राज्यातही जळगाव जिल्हा तिसºया स्थानी आहे. चालू वर्षात सहा गुन्ह्यांमध्ये आठ जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्या शिक्षेचे प्रमाण ४७ टक्के इतके आहे. दरम्यान, २०१८ ते २०१९ या दोन वर्षाच्या कालावधीत ५७ सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. कारवाया व शिक्षा या दोन्ही प्रकारात जळगाव जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालवाधीत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये एसीबीने बॅनर्स व भीत्तीपत्रके लावली आहेत. भ्रष्टाचार कमी व्हावा व लोकांनी त्याविरुध्द आवाज उठवून एसीबीकडे तक्रार करावी यासाठीच हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी विभागाने केलेली दोन वर्षाची कारवाई व शिक्षेची प्रमाण याची माहिती ‘लोकमत’ ला सांगितली. यंदा सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात आढळून आले असून त्याखालोखाल पोलीस विभागाचा क्रमांक आहे. गेल्या वर्षी ३० तर यंदा दहा महिन्यात २७ सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
मुख्याधिकाºयापासून तर पोलीस शिपायापर्यंत दोषी
न्यायालयाने लाचलुपतच्या केसेसमध्ये दोषी धरुन विविध कलमांखाली आठ जणांना दोषी धरुन शिक्षा सुनावली आहे. त्यात भडगाव नगरपालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकारी स्नेहल सुधाकर विसपुते, रवींद्र महारु जाधव, कजगाव तलाठी धनराज भावराव मोरे, मेहुणबारे पोलीस स्टेशनचा कर्मचारी विजय श्रीराम पाटील, चाळीसगाव पंचायत समितीचा लिपिक शांताराम गोविंदा पाटील, जि.प.शिक्षण विभागचा वरिष्ठ सहायक विनायक वनजी बैसाने व चाळीसगाव वन विभागाचा वनपाल रघुनाथ रामदास देवरे यांचा समावेश आहे.

एसीबी ट्रॅप... अब तक ५७
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात २०१८ पासून आजपर्यंत ५७ जण अडकले आहेत. त्यात महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, वन विभाग, परिवहन, शिक्षण समाजकल्याण, कृषी, मत्स विभाग यासह इतर विभागातील वर्ग ४ ते वर्ग १ च्या अधिकाºयापर्यंत समावेश आहे. यंदाही सर्वाधिक लाचखोर महसूलचेच सापडले असून त्याखालोखाल पोलीस विभागाचा क्रमांक आहे. तिसºया स्थानी महावितरण आहे. गेल्या वर्षी महसूल आणि पोलीस दोन्ही विभागातील लाचखोरांची संख्या सारखीच होती. यंदा तर जेथे न्यायाची अपेक्षा असते त्याच ग्राहक मंचात लाचखोरी उदयास आली.

खासगी महाविद्यालयेही रडावर
जातपडताळणी विभागामार्फत जातीचे प्रमाणपत्र वितरीत करताना जातपडताळणी विभाग व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील खादाडांवरही एसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासह गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अडथळे या विभागाने दूर केले आहेत. भुसावळ व जळगाव येथील दोन महाविद्यालयाच्या लिपिकांवर कारवाई करण्यात आली.

Web Title:  District 1 guilty of ACB crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.