जिल्हा बँकेची चोपडा शाखा रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 01:06 AM2017-02-11T01:06:42+5:302017-02-11T01:06:42+5:30

नाबार्डच्या अधिकाºयांनी केली चौकशी

District bank chopper branch radar! | जिल्हा बँकेची चोपडा शाखा रडारवर!

जिल्हा बँकेची चोपडा शाखा रडारवर!

Next

चोपडा/ जळगाव  : नोटाबंदीनंतर ९ ते ११ नोव्हेंबर २०१६ यादरम्यान स्वीकारण्यात आलेल्या नोटांबाबत नाबार्डच्या विशेष पथकाने चोपडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत येऊन चौकशी केल्याचे वृत्त आहे.   या पथकात कोण अधिकारी होते, याची माहिती मिळू शकली नाही. याबाबत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गांधी चौक परिसरातील जिल्हा बँकेच्या  मुख्य शाखेत शुक्रवारी दुपारी दोन सदस्यीय पथक दाखल झाले. त्यामुळे जेडीसीसी कर्मचाºयांची तारांबळ उडाली. या दोन्ही अधिकाºयांनी बँकेतील लेजर आणि इतर रजिस्टरची तपासणी केली. जळगावहून तपासणीसाठी पथक आले असल्याचे प्रभारी व्यवस्थापक आनंदराव पाटील यांंनी सांगितले. रजेवर असलेले  शाखाधिकारी डी.बी. पाटील यांनी नेमके काय याविषयी अनभिज्ञता दाखविली. मात्र नोटाबंदीच्या कालखंडात जुन्या नोटा स्वीकारण्याचा अधिकार होता काय किंवा जुन्या नोटा बदलून दिल्या  काय? याची तपासणी होत असल्याचे समजले, असेही ते म्हणाले.

अन्य शाखांचीही चौकशी

बंदीनंतर स्वीकारलेल्या नोटांसंदर्भात चौकशीसाठी नाबार्डचे पथक आले आहे. जळगावातील जिल्हा बँकेच्या शाखांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात अधिकृत माहितीसाठी जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख व चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: District bank chopper branch radar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.