जिल्हाधिकारी व जि.प.अध्यक्ष, तहसीलदारांनी हटविला लाल दिवा

By Admin | Published: April 21, 2017 12:14 PM2017-04-21T12:14:21+5:302017-04-21T12:14:21+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय चारचाकीवरील लाल दिवा हटविला.

District Collector and District President, Tehsildar deleted the red light | जिल्हाधिकारी व जि.प.अध्यक्ष, तहसीलदारांनी हटविला लाल दिवा

जिल्हाधिकारी व जि.प.अध्यक्ष, तहसीलदारांनी हटविला लाल दिवा

googlenewsNext

 जळगाव,दि.21- केंद्र सरकारने लोकप्रतिनिधी, मंत्री व इतर नेत्यांच्या शासकीय वाहनांवरील किंवा चारचाकीवरील लाल दिवे वापरण्यासंबंधी बंदी घातल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय चारचाकीवरील लाल दिवा हटविला. सायंकाळी कासोदा येथे पोहोचल्यानंतर अध्यक्षा पाटील यांनी हा लाल दिवा हटविला. केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा आपण सन्मान करतो. त्याची अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य असल्याचे अध्यक्षा पाटील यांनी म्हटले आहे.  तहसीदारांनीही आपल्या वाहनावरील दिवा काढून घेतला.

सायंकाळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर याच्या वाहनावरील दिवा काढून घेतला़उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी त्याच्या वाहनावरील दिवा काढून घेतला़ तसेच जळगाव तालुक्याचे तहसीलदार अमोल निकम व जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनीही शासकीय वाहनावरील दिवा काढून घेतला़ शुक्रवारी आणखी काही अधिकारी दिवा काढून घेणार आहेत.

Web Title: District Collector and District President, Tehsildar deleted the red light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.