जिल्हाधिका:यांमुळे टळले मनपाचे वीज खंडितचे संकट
By admin | Published: March 31, 2017 06:18 PM2017-03-31T18:18:48+5:302017-03-31T18:18:48+5:30
जळगाव महापालिकेच्या थकीत विज बिलासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी तत्काळ निर्णय घेतल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे संकट टळले आहे.
Next
तातडीने दिला मुद्रांक शुल्कचा निधी: अन्यथा पाणीपुरवठाही झाला असता ठप्प
जळगाव: मनपाची वीज मंडळाच्या बिलाची थकबाकी असल्याने ती वसुलीसाठी वीज मंडळाने शुक्रवारी मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता. आयुक्त तसेच महापौरांनी शुक्रवारी मनपात प्रभाग समिती सभापती निवडीच्या सभेसाठी आलेल्या जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली. जिल्हाधिका:यांनी तातडीने निर्णय घेत मनपाला मुद्रांक शुल्कचा 1 कोटी 79 लाखांचा निधी तातडीने खात्यावर वर्ग करून दिला. त्यातून मनपाने वीज मंडळाला 1 कोटी 33 लाख 15 हजारांचा भरणा केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट टळले.
आयुक्त जीवन सोनवणे तसेच महापौर नितीन लढ्ढा यांनी शुक्रवारी मनपात प्रभाग समिती सभापती निवडीच्या सभेसाठी आलेल्या जिल्हाधिका:यांशी या विषयावर चर्चा केली. जिल्हाधिका:यांनी वीज मंडळाच्या अधिका:यांशीही चर्चा केली. मात्र सक्तीची वसुली मोहीम राबविण्याचे आदेश असल्याचे या अधिका:यांनी जिल्हाधिका:यांना सांगितले. त्यामुळे जिल्हाधिका:यांनी तातडीने निर्णय घेत मनपाला मुद्रांक शुल्कचा 1 कोटी 79 लाखांचा निधी तातडीने खात्यावर वर्ग करून दिला. त्यातून मनपाने वीज मंडळाला 1 कोटी 33 लाख 15 हजारांचा भरणा केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट टळले.