डॉक्टर नसलेल्या ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन बेडचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:29 AM2020-08-28T00:29:25+5:302020-08-28T00:30:32+5:30

डॉक्टर नसलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात २० आॅक्सिजन बेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी लोकार्पण केले.

District Collector donates oxygen bed to a non-doctor rural hospital | डॉक्टर नसलेल्या ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन बेडचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले लोकार्पण

डॉक्टर नसलेल्या ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन बेडचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले लोकार्पण

Next
ठळक मुद्देरोटरी क्लबने बेड दिले, तुम्ही डॉक्टर, रुग्णवाहिका द्या, तालुकावासीयांच्या अपेक्षा



गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : डॉक्टर नसलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात २० आॅक्सिजन बेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी लोकार्पण केले.
बोदवड ग्रामीण रुग्णालयात गेल्या २७ दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नाही. परिणामी हे ग्रामीण रुग्णालय बंद पडले आहे. याच रुग्णालयात जळगाव येथील रोटरी क्लब तसेच बोदवड येथील खुबचंद अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माणकचंद अग्रवाल यांच्या सौजन्याने २० आॅिक्सजन बेड देणगी स्वरुपात मिळाले आहेत. त्याचे लोकार्पण २७ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष तुषार चित्रे, उपाध्यय संजय इंगळे, योगेश भोळे, कृष्णकुमार वाणी, विवेक काबरा, सुनील सुखवणी, प्रांताधिकारी आर.एस.सुलाने, तहसीलदार हेमंत पाटील, एनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश पाटील, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, माणकचंद अग्रवाल उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी राऊत यांनी दातृत्वातून रुग्णालयाला बेड मिळाले त्याचे कौतुक केले, मात्र ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकाºयाबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. आजच्या स्थितीत येथे वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने हे आॅक्सिजन बेड हे निव्वळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत. परिणामी ‘ रोटरी क्लबने बेड दिले, तुम्ही डॉक्टर द्या,’ अशी अपेक्षा तालुकावासीयांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

बोदवड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयाच्या रिक्त जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.
-हेमंत पाटील, तहसीलदार, बोदवड


बोदवड ग्रामीण रुग्णालय, येवती प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कोविडसाठी या तीन रुग्णवाहिकांची मागणी केली आहे.
-अजय सपकाळ, प्रभारी तालुका आरोग्याधिकारी, बोदवड
 

Web Title: District Collector donates oxygen bed to a non-doctor rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.