जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मागवले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:14+5:302021-01-08T04:50:14+5:30
जळगाव : जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकीबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्याच्या अपर मुख्य सचिव यांचे मार्गदर्शन मागवले आहे. माहिती अधिकार ...
जळगाव : जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकीबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्याच्या अपर मुख्य सचिव यांचे मार्गदर्शन मागवले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी गट अ संवर्गातील राजपत्रीत अधिकारी यांना प्रथम अपीलीय अधिकारी आणि गट ब या संवर्गातील राजपत्रीत अधिकारी यांना जनमाहिती अधिकारी म्हणून आदेशीत करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात केला आहे. त्यासाठीच हा अर्ज करण्यात आला आहे.
या पत्रात जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे की,‘ गुप्ता यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांच्या २०१६ च्या आदेशाचा संदर्भ दिला आहे. मात्र हे आदेश सर्वांसाठी नसुन फक्त नागपूर कार्यालयासाठीच असल्याची धारणा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. याआदेशात राजपत्रित अधिकारी यांना जनमाहिती अधिकारी म्हणून नेमणुक देणे बंधनकारक नसुन केवळ संकेत आहेत, असेही कार्यालयाचे मत आहे. सामान्य जनतेला संकलननिहाय माहिती परिपुर्ण आणि जास्तीत जास्त मिळावी यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशात बदल करणे उचीत होणार नाही. गुप्ता यांनी केलेल्या मागणीच्या अनुषगांने राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांच्या ४ फेब्रुवारी २०१६ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन होण्याची विनंतीही पत्रात केली आहे.