जिल्हाधिकाऱ्यांचा संंशय ठरला खरा, भुसावळ तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांची नावे झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 03:44 PM2020-05-31T15:44:30+5:302020-05-31T15:46:12+5:30

कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे.

The District Collector's suspicion was true, the names of one and a half hundred farmers in Bhusawal taluka were reduced | जिल्हाधिकाऱ्यांचा संंशय ठरला खरा, भुसावळ तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांची नावे झाली कमी

जिल्हाधिकाऱ्यांचा संंशय ठरला खरा, भुसावळ तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांची नावे झाली कमी

Next
ठळक मुद्देव्यापाºयांचा हिरमोडअवघ्या १५ दिवसात सुमारे ४० हजार क्विंटल कापूस खरेदीचे आव्हान

उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे. जामनेर व यावल येथील पन्नास गावांची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. मात्र त्या गावातील किती शेतकरी व किती क्विंटल कापूस यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे किमान ४० हजार क्विंटल कापूस मोजण्याचे आव्हान सीसीआय कापूस खरेदी केंद्रला आहे.
२३ मे रोजी दिले पंचनाम्याचे आदेश
कापूस विक्रीसाठी सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी झाली. २२ मे पर्यंत जिल्ह्यात ४८ हजार ३९१ कापूस उत्पादक शेतकºयांच्या घरात कापूस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद झालेल्या याद्यांवरून दिसून आले. यातील केवळ चार हजार ८९३ शेतकºयांचा कापूस विक्री झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ४३ हजार ४९८ नोंदणीकृत शेतकºयांचा कापूस घरात पडून असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या लक्षात आले. शेतकºयांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे व कसा? याचा अंदाज बांधता यावा यासाठी २३ मे रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांना तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. पंचनामा केल्यानंतर त्या याद्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे द्याव्या. सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना याद्या देऊन कापूस खरेदीच्या सूचना कराव्या, असे आदेशात नमूद करण्यात आले होते.
तहसील कार्यालचा पुन्हा बाजार समितीवरच विश्वास
तालुक्यात कृ.उ.बा. समितीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना दिलेल्या २५ गावातील ७२९ शेतकºयांच्या याद्यांचे पंचनामे अवघ्या दोन दिवसात पूर्ण करण्यात आले व ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे पंचनाम्यानंंतर दिसून आले. याद्यांमध्ये व्यापाºयांंनी त्यांच्या सोयीसाठी टाकलेली तब्बल १५० शेतकºयांची नावे कमी करून तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्या याद्या तहसील कार्यालयाला सादर केल्या. तहसील कार्यालयाने या याद्या स्वत: तयार न करता पुन्हा कृ.उ.बा.कडे दिल्या. जिल्हाधिकाºयांनी अप्रत्यक्ष अविश्वास व्यक्त केल्यामुळे तालुक्यात १५० शेतकरी अतिरिक्त ठरले. तरीही तहसील कार्यालयाने याद्या अद्ययावत करण्यासाठी कृ.उ.बा.कडे देण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित झाला. कृ.उ.बा.ने दोन दिवस या याद्या हाताळल्या. त्यामुळे पुन्हा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महिनाभरात केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी, ५० हजार क्विंटल कधी मोजणार?
दरम्यान , जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ३ मे पासून पुन्हा खरेदी सुरू झाली आहे. मात्र कधी जागेची अडचण, कधी मशनरी नादुरुस्त, तर कधी शेतकºयांशी वाद यामुळे २५ दिवसांमध्ये पाच ते सहा दिवस कापूस खरेदी बंद होती. त्यात ईद व रविवारच्या सुट्ट्या वेगळ्याच. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस खरेदी केंद्र १५ जून पासून बंद होणार असल्याचे वृत्त आहे. सुरू राहिले तरी १५ दिवसानंतर पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ दिवसांमध्ये तालुक्यातील २५ गावातील ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस व खरेदी केंद्रावर यावल तालुक्यातील २५ व जामनेर तालुक्यातील २४ अशा दोन तालुक्यातील किमान ५० गावातील एक हजार शेतकºयांचा ४० हजार क्विंटल कापूस असू शकतो.
अवघ्या पंधरा दिवसात ते हे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याद्या कृ.उ.बा.कडून
तहसीलदार दीपक देवरे यांच्याशी संपर्क केला असता मोबाईलवर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कृ.उ.बा. समितीमध्ये शेतकºयांच्या याद्यांचा डाटा असल्यामुळे त्यांच्याकडून याद्या तयार करून घेण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. मात्र या याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा तहसील कार्यालयातून करण्यात आला आहे.

Web Title: The District Collector's suspicion was true, the names of one and a half hundred farmers in Bhusawal taluka were reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.