आयटीआयची २९ पासून जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 09:00 PM2020-12-24T21:00:54+5:302020-12-24T21:01:05+5:30

जळगाव - औद्योगिक प्र शिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबरपासून सुरु झालेली आहे. या प्रवेश प्रक्रीयेच्या २३ डिसेंबरपर्यंत एकूण ...

District level counseling round of ITI from 29th | आयटीआयची २९ पासून जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी

आयटीआयची २९ पासून जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी

googlenewsNext

जळगाव - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबरपासून सुरु झालेली आहे. या प्रवेश प्रक्रीयेच्या २३ डिसेंबरपर्यंत एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पुढील जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी २९ व ३० डिसेंबर रोजी होणार आहे.
सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय रिक्त जागांसाठी प्रवेशइच्छूक उमेदवारांना व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करुन जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉगीन करुन कोणत्याही एका जिल्ह्याच्या समुपदेशन फेरीकरीता २५ व २६ डिसेंबरपर्यंत सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांची जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संगणक प्रणालीव्दारे गुणवत्ता यादी प्रकाशीत केली जाईल व तशी माहिती एसएमएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे.

गुणवत्ता क्रमांकानुसार बोलविण्यात येणार
दरम्यान, दिलेल्या वेळेत व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुदपदेशन फेरीकरीता बोलविण्यात येणार आहे. प्रवेशाकरीता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची आर्हता या आधारावर २९ व ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रीयेच्यावेळी जागांचे वाटप केले जाईल. या प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल.

 

Web Title: District level counseling round of ITI from 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.