जिल्हास्तरीय लोकशाहीदिनी १२ तक्रारी अर्ज प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:29+5:302021-06-09T04:21:29+5:30
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी ऑनलाइन पध्दतीने लोकशाही दिन घेण्यात आला. यामध्ये जिल्हाभरातून १२ तक्रारी अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले ...
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी ऑनलाइन पध्दतीने लोकशाही दिन घेण्यात आला. यामध्ये जिल्हाभरातून १२ तक्रारी अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे अध्यक्षस्थानी होते. या लोकशाहीदिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. एकूण १२ तक्रार अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार जळगाव कार्यालयाकडे ०४, तहसीलदार जामनेर ०२, तहसीलदार पारोळा ०१, तहसीलदार यावल ०१, तहसीलदार चोपडा ०१, तहसीलदार पाचोरा यांचेकडे ०३ याप्रमाणे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.
यांची होती उपस्थिती...
जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपवनसंरक्षक विवेक होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख राजेंद्र कपोते, सहायक निबंधक मंगेशकुमार शहा, पोलीस उप निरीक्षक मकसुद शेख, वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री. वाणी यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. तर तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचेसह तक्रारदार नागरिक ऑनलाइन उपस्थित होते.
पूर्तता अहवाल सादर करा...
दरम्यान, जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. सोमवारी प्राप्त अर्ज दाखल करून घेण्यात आले व संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी २ दिवसात पाठविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिलेत. या अर्जावर संबंधित विभागांनी कार्यवाही करून पुढील लोकशाही दिनात पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.