जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनात ११ तक्रार अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 10:31 PM2021-05-03T22:31:48+5:302021-05-03T22:32:14+5:30
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यामध्ये ११ तक्रार ...
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यामध्ये ११ तक्रार अर्ज दाखल झाले.
तहसीलदार जळगाव कार्यालयाकडे ५, तहसीलदार चाळीसगाव ४, तहसीलदार जामनेर २ याप्रमाणे तक्रार अर्ज प्राप्त झाले. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. तसेच सदरच्या तक्रारी ज्या विभागाशी संबंधित असतील त्यांच्याकडे तक्रार निवारणासाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले.
यावेळी प्रलंबित प्रकरणांचाही आढावा घेऊन नागरीकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. आज प्राप्त अर्जांवर संबंधित विभागांनी कार्यवाही करुन पुढील लोकशाही दिनात पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले.जिल्हास्तरीय लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते तर तालुक्याच्या ठिकाणाहून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन उपस्थित होते.