जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 14 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:00 PM2021-03-01T21:00:28+5:302021-03-01T21:00:28+5:30

जळगाव  - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली  झाला. या ...

District level online democracy day 14 applications filed | जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 14 अर्ज दाखल

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 14 अर्ज दाखल

Next


जळगाव - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली  झाला.

या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 14 तक्रारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने तहसिलदार जामनेर कार्यालयाकडे 4, तहसिलदार यावल -2, तहसिलदार रावेर - 2, तहसिलदार अमळनेर - 4, तहसिलदार चोपडा - 1, तहसिलदार चाळीसगाव यांचेकडे 1 याप्रमाणे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हास्तरीय लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. तर तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. आज प्राप्त अर्ज दाखल करुन घेण्यात आले व संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी 2 दिवसात पाठविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिलेत. या अर्जावर संबंधित विभागांनी कार्यवाही करुन पुढील लोकशाही दिनात पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Web Title: District level online democracy day 14 applications filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.