शिवसेनेची २५ रोजी जिल्हा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:41+5:302020-12-23T04:13:41+5:30
गुजराल पेट्रोल पंप परिसरात अतिक्रमण कारवाई जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मंगळवारी गुजराल पेट्रोल पंप परिसरातील हातगाड्याचालकांवर कारवाई ...
गुजराल पेट्रोल पंप परिसरात अतिक्रमण कारवाई
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मंगळवारी गुजराल पेट्रोल पंप परिसरातील हातगाड्याचालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही वेळ गोंधळदेखील झाला. या ठिकाणाहून ८ हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला. यासह बळीराम पेठ, गणेश कॉलनी चौक भागातदेखील मनपाकडून कारवाई करण्यात आली.
उप-महापौरांनी केली जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
जळगाव - मनपाचे उप-महापौर सुनील खडके यांनी मंगळवारी वाघुर पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक चेतन सनकत, मनोज अहुजा, ॲड. दिलीप पोकळे, अमीत काळे यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते. या केंद्रावरील विविध संयंत्रे जुनी झालेली असल्याचे आढळून आली. दरम्यान, उप-महापौरांनी बुस्टर पंपिंग स्टेशनलाही भेट दिली. याठिकाणी सहापैकी एक युनिट बंद आढळून आले. हे त्वरित सुरू करण्याचा आदेश उप-महापौरांनी दिला आहे.