जि. प. सदस्य अपात्रता प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:26 PM2017-11-25T12:26:20+5:302017-11-25T12:27:45+5:30
पत्रपरिषद : डॉ.सतीश पाटील यांचा आरोप
ठळक मुद्देपूर्वीच्याच पदाधिका:यांवर जबाबदारीअपीलात जाण्याबाबत विचार
जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघा सदस्यांनी व्हिप न जुमानता अनुपस्थिती दिल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची प्रस्तावाद्वारे केलेली राष्ट्रवादीची मागणी जिल्हाधिकारी यांनी राजकीय दबावातून फेटाळल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प. सदस्य आत्माराम सुपडू कोळी, पल्लवी जितेंद्र पाटील आणि मिना रमेश पाटील या तिघांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी व्हिप न पाळल्याने पक्षाचे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी या तिन्ही सदस्यांना अपात्र ठरवावे, असा प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे दाखल केला होता. यावर सुनावणी होऊन सबळ पुराव्याअभावी हा प्रस्ताव जिल्हाधिका:यांनी फेटाळला. याबाबत 24 रोजी शुक्रवारी दुपारी पत्रपरिषदेत डॉ.सतीश पाटील यांनी सांगितले की, प्रस्तावाबाबतचा हा निर्णय आम्हाला शुक्रवारीच कळाला. गटनेते साळुंखे यांनीही अद्याप र्पयत अपाल्याला काहीही कळविण्यात आले नसल्याचे सांगून या प्रकाराबाबत आश्चर्यही व्यक्त केले. तर हा निर्णय राजकीय दबावात घेतला गेला असावा. त्यामुळे अपीलात जाण्याबाबत विचार केला जाईल, असेही डॉ.सतीश पाटील यांनी सांगितले. पूर्वीच्याच पदाधिका:यांवर जबाबदारीदोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी स्वत: जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी बरखास्त केली होती. मात्र निवड प्रक्रियेत काही अडचणी आल्याने पूर्वीच्याच पदाधिका:यांना सध्या जबाबदारी देण्यात आली असून गरज पडल्यास काही फेरबदल केले जातील, असे डॉ. सतीश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.