जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:28+5:302021-08-28T04:21:28+5:30
जळगाव : जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ...
जळगाव : जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दिली आहे.
या बैठकीत समितीच्या २९ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मान्य करणे, जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मध्ये मार्च- २०२१ अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ मध्ये माहे जुलै २१ अखेर खर्चाचा आढावा घेणे, नियोजन विभागाच्या २८ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार २०२०-२१ मध्ये मंजूर नियतव्यय ३७५ कोटी रुपयांच्या २५ टक्केच्या मर्यादेत कोविड उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या ४४ कोटी ९ लाख १६ हजार रुपयांच्या निधीस कार्योत्तर मंजुरी देणे, १९ एप्रिल २०२१ नुसार २०२१-२२ साठी एकूण मंजूर नियतव्यय ४०० कोटी रुपयांच्या ३० टक्के रक्कम १२० रुपये कोटी निधी कोविड उपाययोजनांसाठी खर्च करण्याच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा नियोजन अधिकारी पाटील यांनी सांगितले.