जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:06+5:302021-04-02T04:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस दलाला सुपूर्द करण्यात येणार आहे. यात २९ चारचाकी आणि ७० दुचाकींचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन समितीने २४ जानेवारीला २९ चारचाकी आणि ७० दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी २ कोटी, ३० लक्ष, ९६ हजार, ४७८ रूपयांची तरतूद करण्यात आली होती. पालकमंत्री यांच्या हस्ते ही वाहने २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे.
महिला रुग्णालयाची पाहणी
दरम्यान, जिल्ह्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मोहाडी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या महिला महाविद्यालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येणार आहे. या संदर्भात सुरू असणार्या कामांचा आढावा घेण्यासाठी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री हे या हॉस्पिटलची पाहणी करणार आहेत.