जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:03 PM2019-11-10T12:03:08+5:302019-11-10T12:03:23+5:30

दर तासांनी महानिरीक्षकांकडून आढावा । पोलिसांचा दिवसभर खडा पहारा

 District Police Superintendent took control of the control room | जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा

Next

जळगाव : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांनी रात्रंदिवस खडा पहारा दिला तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संवेदनशील भागात भेटी देवून थेट नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला. पोलिसांचे योग्य नियोजन, सोशल मीडियााबाबत केलेले आवाहन व जिल्ह्यातील नागरिकांनी सौहार्दाची भूमिका घेतली.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात बाहेरुन एसआरपी कंपनी व दोन हजाराच्यावर होमगार्ड मागविण्यात आले आहेत. सलग दोन दिवस हा बंदोबस्त कायम राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.
नियंत्रण कक्षातून आढावा
डॉ. उगले यांनी शनिवारी शहरातील संवेदनशील भागात भेट दिल्यानंतर ११ वाजता नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला. तेथून प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकाऱ्यांकडून ते माहिती जाणून घेत होते. त्याशिवाय फिक्स पॉर्इंट व हॉटस्पॉटवरील कर्मचारी थेट नियंत्रण कक्षाच्या संपर्कात होते.दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे दर एक तासांनी पोलीस अधीक्षकांकडून आढावा घेत होते.
त्यांच्या दिमतीला एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक डी. एम. पाटील, सीआरओ पवार, राखीव निरीक्षक सुभाष कावरे, सहायक निरीक्षक आखेगावकर, उपनिरीक्षक दिलीप पाटील आदी अधिकाऱ्यांचा ताफा होता.
शस्त्रधारी कमांडो पथक राखीव ठेवण्यात आले होते.
अनेक मोक्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. हे पोली परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
दोन दिवस पोलिसांच्या सुट्टया रद्द
ईद- ए- मिलाद आणि अयोध्या निकाल हे दोन प्रकरणे सध्या संवेदनशील आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. सोशल मिडीयावरुन अफवा पसरविणारे संदेश यावर विशेष नजर ठेवण्यात आली. बहुतांश गृप अ‍ॅडमीनने सर्व सदस्यांना ब्लॉक केले आहे. गृपवर फक्त अ‍ॅडमीन यांचेच मेसेज येत होते. त्यात अयोध्या हा विषय नव्हता. सर्वांकडूनच शांततेचे आवाहन करण्यात आले.

Web Title:  District Police Superintendent took control of the control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.