जिल्ह्याला लसींचे ४९ हजार डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:17 AM2021-07-30T04:17:27+5:302021-07-30T04:17:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात गुरूवारी सायंकाळी ३१ हजार कोविशिल्ड तर १८ हजार कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात गुरूवारी सायंकाळी ३१ हजार कोविशिल्ड तर १८ हजार कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहे. त्यातून जळगाव शहराला प्रत्येकी तीन तीन हजार डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व केंद्र शुक्रवारी सुरू राहणार आहेत.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने काही केंद्र बंद ठेवण्यात आली होती. महापालिकेची केंद्र तर दोन दिवस बंदच होती. गुरूवारी रेाटरी भवनातील केंद्रावर लसीकरण सुरू होते. अखेर गुरूवारी सायंकाळी लस प्राप्त झाल्यानंतर केंद्रांना वाटप करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी ती केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच डोस प्राप्त झाले आहे.
असे झाले वाटप
आलेल्या लसींमधून महापालिकेच्या केंद्रांना दीड हजार, रोटरी व रेडक्रॉस तसे पोलीस मल्टीपर्पज या केंद्रांना दीड हजार कोविशिल्ड त्याच प्रमाणे कोव्हॅक्सिनही याच प्रमाणे दीड -दीड हजार देण्यात आले आहेत. यासह प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना ४००, शहरी आरोग्य केंद्रांना प्रत्येकी २०० तर आरोग्य केंद्रांना शंभर या प्रमाणे वाटप करण्यात आले आहे.