जिल्ह्याचा निकाल ९३.५१ टक्के ; निकालाचा टक्का १६.५९ ने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:09 PM2020-07-29T23:09:39+5:302020-07-29T23:09:52+5:30

दहावी निकाल

District result 93.51 percent; The result percentage increased by 16.59 | जिल्ह्याचा निकाल ९३.५१ टक्के ; निकालाचा टक्का १६.५९ ने वाढला

जिल्ह्याचा निकाल ९३.५१ टक्के ; निकालाचा टक्का १६.५९ ने वाढला

googlenewsNext


जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल यावर्षी ९३.५१ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याच्या निकालाचा टक्का तब्बल १६़५९ ने वाढला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल ७६़९२ टक्के इतका लागला होता. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी जळगाव जिल्हा नाशिक विभागात तिसऱ्या स्थानी राहिला आहे. तसेच यंदा निकालात मुलीच अव्वल असल्याचे पहावयास मिळाले आहे.मुलींच्या यशाची परंपरा यंदाही कायम राहीली आहे़

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ५९ हजार ७१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात ३३ हजार ७५१ मुले तर २५ हजार ३२० मुली होत्या. त्यापैकी ५५ हजार २४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३१ हजार ८४ मुले तर २४ हजार १५६ मुली आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२़१० तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५़४० इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी ३़३० ने अधिक असून, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा आम्हीच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यात १३४ परीक्षा केंद्र होती.

१९ हजार २७० विद्यार्थी ‘मेरीट’मध्ये
जळगाव जिल्ह्यातून यावर्षी १९ हजार २७० विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे, २१ हजार २५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२ हजार २२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ हजार ४९५ विद्यार्थी हे पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी तब्बल १६़५९ ने वाढली आहे. अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोल विषयाचे मिळालेले सरासरी गुण या प्रमुख कारणांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली असावी, असा अंदाज शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Web Title: District result 93.51 percent; The result percentage increased by 16.59

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.