धरणगाव व जळगाव तालुक्यातील १३६ किमीच्या रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:54 PM2018-11-25T21:54:27+5:302018-11-25T21:56:17+5:30
धरणगाव व जळगाव तालुक्यातील १३६ किमीच्या ७ रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.
धरणगाव : तालुक्यातील व जळगाव तालुक्यातील १३६ किमीच्या ७ रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या विकासासाठी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी ठराव मांडला होता.
असे आहेत दर्जावाढ झालेले रस्ते
राष्ट्रीय महामार्ग ६ असोदा- देऊळवाडे रस्ता - १३ किमी , घार्डी - नांद्रा - लाडली रस्ता - १२ किमी , भादली - गाढोदा - चमगाव - सोनवद रस्ता - ११ किमी , अहिरे बु. - पष्टाने - धानोरा - आनोरा - गारखेडा - धरणगाव - बोरगाव रस्ता - ३० किमी, धरणगाव - बाभळे - खरदे- नारणे -नांदेड रस्ता - २३.५०० किमी , रोटवद - साळवा - खरदे बु. -भामर्डी - उखळवाडी - सोनवद रस्ता- १५ किमी, भोकर - गाढोदा - दहिदुल्ले - खामखेडा - निमखेडी रस्ता - १७.५०० किमी , रिधुर - नांद्रा - चांदसर कवठळ ते प्रमुख जिल्हा मार्ग ७९ शेरी रस्ता - १३.५०० किमी. या जिल्हा परिषदेच्या ७ रस्त्यांच्या १३६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे.
सदर रस्त्यांवरील गावांची संख्या , लोकसंख्या व रस्त्यांवर होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या ७ रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जावाढ करण्यास मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची निधी अभावी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी खूप जिकरीचे झाले होते.