काळीमा फासणाºया घटनांनी जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:14 PM2019-03-30T22:14:06+5:302019-03-30T22:16:53+5:30

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून समाजात काळीमा फासणाºया घटनांचे प्रमाण वाढले आहे. अनैतिक संबंधाला अडथळा असो कि अनैसर्गित कृत्य या यातून निष्पान चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्या. त्यात भर पडली ती आणखी बापानेच मुलीला वासनेची शिकार बनविल्याच्या घटनेची. या घटनांनी जिल्हा पुरता हादरला असून समाजमन सुन्न झाले आहे.

The district was shaken by the events of Kalima Fasna | काळीमा फासणाºया घटनांनी जिल्हा हादरला

काळीमा फासणाºया घटनांनी जिल्हा हादरला

Next
ठळक मुद्दे विश्लेषण दोन मुलांचे खूनआई, वडील व बहिणीची आत्महत्या


सुनील पाटील
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून समाजात काळीमा फासणाºया घटनांचे प्रमाण वाढले आहे. अनैतिक संबंधाला अडथळा असो कि अनैसर्गित कृत्य या यातून निष्पान चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्या. त्यात भर पडली ती आणखी बापानेच मुलीला वासनेची शिकार बनविल्याच्या घटनेची. या घटनांनी जिल्हा पुरता हादरला असून समाजमन सुन्न झाले आहे.
अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे जन्मदात्या मातेनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला संपविले. ही घटना ताजी असतानाच भडगाव येथे देखील एका निष्पाप बालकाची हत्या करण्यात आली. अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर या बालकाला संपविण्यात आले. मुलाच्या मृत्यूच्या या विरहातून आई, वडील व बहिंण अशा तिघांनीही सामुहीक आत्महत्या केली.या घटनेने तर संपूर्ण राज्यच हादरले. वासनांध लोकांमुळे या चिमुरड्यांचा नाहक बळी गेला आहे. जळगाव शहरातही जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला वासनेची शिकार बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकाच दिवशी या दोन्ही घटना उघडकीस आल्या. त्याशिवाय याच महिन्यात जामनेर तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्याची माजी सरपंच व सहकाºयांनी हत्या केली. गैरव्यवहाराचे बींग फुटू नये म्हणून या सदस्याची हत्या करण्यात आली. महिनाभरातील या सलगच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. घटनांवर प्रकाशझोत टाकला तर समाजातील विकृती कोणत्या थराला चाललीय हे लक्षात येते. 
मुलाच्या हत्येचे दु:ख सहन न झाल्याने आई, वडील व बहिण या तिघांनी आत्महत्या केली. आता या कुटुंबात कोणीही शिल्लक राहिले नाही. काय दोष होता या बालकाचा व त्यांच्या पालकांचा. एका विकृतामुळे संपूर्ण कुटुंबच संपले. दुसरी एक घटना अशी की, साखरपुडा केल्यानंतर मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. समाजात बदनामी झाली, काय तोंड देणार या नैराश्यातून पित्याने आत्महत्या केली तर आईलाही ह्दयविकाराचा झटका आला. समाजमन सुन्न करणाºया या घटना लागोपाठ शहर व जिल्ह्यात घडल्या आहेत.

Web Title: The district was shaken by the events of Kalima Fasna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.