जिल्ह्यासाठी आज ३९ टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:57+5:302021-04-11T04:15:57+5:30

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात माजी मंत्री एकनाथ ...

The district will get 39 tons of liquid oxygen today | जिल्ह्यासाठी आज ३९ टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार

जिल्ह्यासाठी आज ३९ टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार

Next

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करीत जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली. त्यानुसार रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे.

जिल्ह्यात दिवसाला साधारण ११०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी पुरवठा मात्र मर्यादित आहे. त्यामुळे आतापर्यंत जळगावात पुरवठ्यावर परिणाम झालेला नसला तरी आगामी काळात मागणी वाढत राहिल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पुरवठादाराने व्यक्त केली होती, तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एकदिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आले होते. याची दखल घेत एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार जिल्ह्यात एकच दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे लक्षात आल्यानंतर खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली.

यासोबतच रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत चर्चा केल्यानंतर चार हजार इंजेक्शन जिल्ह्यात पाठविण्यात आले होते, तर आतादेखील येत्या दोन दिवसांत आवश्यक असतील तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन पाठविण्याचे आश्वासन राजेंद्र शिंगणे यांनी खडसे यांना दिले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Web Title: The district will get 39 tons of liquid oxygen today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.