जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:38+5:302021-03-23T04:17:38+5:30
जळगाव : जिल्ह्यात नवे रुग्ण अधिक व बरे होणाऱ्याची संख्या कमी असे चित्र गेल्या दोन महिन्यांपासून असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी ...
जळगाव : जिल्ह्यात नवे रुग्ण अधिक व बरे होणाऱ्याची संख्या कमी असे चित्र गेल्या दोन महिन्यांपासून असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ९७ टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांवर आला आहे. एकूण ७७,३८० रुग्णांपैकी ६६,१८९ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत, तर १४९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णसंख्या गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने ९५० पेक्षा अधिक नोंदविली जात आहे. दरम्यान, मृत्यूदर घटून १.९३ टक्क्यांवर आला आहे. मात्र, दररोज होणारे मृत्यू हे थांबत नसल्याचे गंभीर चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर व चोपडा, तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ समोर येत आहेत. त्यातच आता अन्य काही तालुक्यांत रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्णत: कोविड करण्यात आले आहे. या ठिकाणी वीस डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव शहरात नुकताच तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. चोपडा तालुक्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.