जिल्हा बँकेच्या शाखेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:34 PM2017-08-29T16:34:31+5:302017-08-29T16:35:45+5:30

कु:हाडची घटना

Disturb at the District Bank branch | जिल्हा बँकेच्या शाखेत गोंधळ

जिल्हा बँकेच्या शाखेत गोंधळ

Next
ठळक मुद्देगैरसोय होत असल्याने शेतक:यांचा संतापकर्मचारी वाढविण्याची मागणी

कु:हाड ता. पाचोरा  -  जिल्हा बँकेच्या येथील शाखेत गैरसोयीने त्रस्त  झालेल्या शेतक:यांच्या संतपाचा उद्रेक झाला. गोंधळातच व्यवस्थापकाशीही झटापट झाली. 
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी सकाळपासून शेतक:यांनी येथील बॅंकेच्या आवारात दुष्काळी अनुदानासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र सदर बॅक ऊशीरा सुरू झाल्याने प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळातच खातेदारांनी बँकेत प्रवेश केला. यापैकी काहींनीबॅंक व्यवस्थापकाच्या कॅबीन मध्ये प्रवेश करीत व्यवस्थापकाशी झटापट केली व लोटुन दिले. या गोंधळातच बॅंकेचे कामकाज बंद पडले.
अगोदरच उशीर झालेल्या 2015- 16 च्या दुष्काळी अनुदानाच्या पैशाविषयी शेतक:यांनी शासन व बॅकेविषयी रोष व्यक्त केला. त्यातच बॅंकेचा  मनमानी कारभार व अपुर्ण कर्मचारी वर्ग असून  एकट्या व्यवस्थापकावर आठ खेडय़ांचा कारभार सोपवला आहे. दरम्यान जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन विद्यमान आमदार किशोर पाटील हे  पाचोरा तालुक्याचे असतानही त्यांचे दुर्लक्ष आहे असा सुर खातेदारांकडुन व्यक्त होत आहे. येथील कर्मचारी संख्या वाढवून मिळावी अशी मागणी आहे. 

Web Title: Disturb at the District Bank branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.