ट्रॅव्हल्स थांब्यासाठी दुभाजक तोडले
By admin | Published: September 17, 2015 12:11 AM2015-09-17T00:11:57+5:302015-09-17T00:12:26+5:30
जळगाव : ट्रॅव्हल्स थांब्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या जागेजवळ मुख्य रस्त्यावरील दुभाजक तोडण्यात आले आहे.
जळगाव : ट्रॅव्हल्स थांब्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या जागेजवळ मुख्य रस्त्यावरील दुभाजक तोडण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विठ्ठल मंदिर संस्थानच्या दोन एकर जागेवर हा थांबा उभारण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसापासून जागा सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र सुरुवातीचे काही दिवस वगळता या कामाची गती आता मंदावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात हा थांबा सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे.
विठ्ठल मंदिर संस्थान व ट्रॅव्हल्स मालक यांच्यात अकरा महिन्याचा करार करण्यात आला आहे. त्यासाठी जागा तयार करुन देण्याची जबाबदारी संस्थानची आहे. सध्या जेसीबीद्वारे जागा सपाटीकरण व मुरुम टाकण्याचे काम सुरु आहे. आजूबाजूचे काटेरी झुडपे तोडण्यात आली आहे. सध्याची स्थिती पाहता किमान अजून आठ दिवस तरी काम पूर्ण होईल, असे वाटत नाही. गणेशोत्सवात प्रवाशांची संख्या तसेच आरास पाहण्यासाठी येणारी गर्दी पाहता हा थांबा लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
नेरी नाका व अजिंठा चौक या भागात रहदारी मोठय़ा प्रमाणात आहे. अपघाताचा धोका टळावा यासाठी मनपाने या रस्त्यावर दुभाजक तयार केले होते.
मात्र ट्रॅव्हल्स थांब्यासाठी स्मशानभूमी समोर असलेले दुभाजक तोडण्यात आल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ट्रॅव्हल्सचा आकार मोठा असल्यामुळे वळण घेताना अडचण निर्माण होईल, त्यामुळे हे दुभाजक तोडल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मनपाचीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे समजते.