दिव्यांग तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:47 AM2019-01-11T11:47:31+5:302019-01-11T11:48:03+5:30
केले विषप्राशन
जळगाव : लहान पणापासून दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या दापोरा येथील चेतन पंडीत पाटील (२४)या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी चेतनने विषप्राशन केले होते. गुरुवारी उपचार सुरु असताना सकाळी ६.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतन पाटील याला लहान पायापासून दोन्ही पायांचे अपंगत्व होते. आई-वडीलांचे १० वषार्पूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आजी केसरबाई व लहान बहिण छोटी यांच्यासह वास्तव्यास होता. मोठी बहिणी जिजाबाई हिचे लग्न झाले आहे.
बुधवारी त्याने घरात एकटे असल्याची संधी साधत विषप्राशन केले होते.
चुलत भाऊ वाल्मिक सुपडू पाटील याने त्याला ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात केले होते. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.
अपंगत्वाचे नैराश्य अन् आई,वडीलांचा मृत्यू
दोन्ही पायाचे अपंगत्व असल्याने तो हातांचा आधार घेत चालत असे. आपण इतरांसारखे का नाही, यामुळे काही दिवसांपासून नैराश्येत होता. तसेच भविष्यात सांभाळ कोण करणार याचेही त्याला नैराश्य होती.त्यातूनच त्याचे विषप्राशन केले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बोरसे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.