प्राथमिक शाळांना २३ आॅक्टोंबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 07:35 PM2019-10-19T19:35:10+5:302019-10-19T19:35:47+5:30
जळगाव : निवडणुकांच्या कार्यक्रमांमुळे प्राथमिक शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बदल करावा, अशी मागणी शिक्षक सेनेने केली होती़ यानुसार दिवाळीच्या सुट्टया ...
जळगाव : निवडणुकांच्या कार्यक्रमांमुळे प्राथमिक शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बदल करावा, अशी मागणी शिक्षक सेनेने केली होती़ यानुसार दिवाळीच्या सुट्टया या आता २३ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आल्या आहे़ शिक्षणाधिकारी डॉ़ देवांग यांनी शुक्रवारी तसे पत्र काढले़
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिवाळी सुटी ही २१ आॅक्टोंबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात आली होती़ मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे़ मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतदान अधिकाऱ्यांना शाळेत अर्थात आपल्या कार्यालयात वेळेत पोहोचणे शक्य होत नसल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे़ मतदान केंद्रासाठी दिलेले साहित्य ताब्यात घेण्यासाठी शिक्षकांना सुटी असली तरी शाळेत जावे लागणार आहे़ त्यामुळे दोन दिवस सुटीचे कमी होणार आहेत़ त्यामुळे ही सुटी २३ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत देण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर सपकाळे, राधेशाम पाटील, संदीप पवार, सुनील चौधरी, उखर्डू चव्हाण, विजय बागूल, राजेश जाधव आदींनी केली होती़ त्यानुसार या मागणीची दखल घेत शिक्षणाधिकाºयांनी ही सुटी मंजूर केली आहे़ ८ नोव्हेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळा नियमित सुरू होतील, असे पत्रात म्हटले आहे़