पिकाला खत देताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:49 PM2019-08-25T23:49:18+5:302019-08-25T23:49:38+5:30

अमळनेर : तालुक्यातील बोदर्डे येथे शेतात खत देत असताना चक्कर येऊन पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २४ रोजी ...

Dizzy and dying young man while giving fertilizer to the crop | पिकाला खत देताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

पिकाला खत देताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

Next



अमळनेर : तालुक्यातील बोदर्डे येथे शेतात खत देत असताना चक्कर येऊन पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २४ रोजी दुपारी घडली.
बोदर्डे येथील रहिवासी हर्षल कैलास बोरसे (वय १८) हा तरुण प्रमोद पितांबर पाटील यांच्या कापसाच्या शेतात मजूर म्हणून खत देण्यासाठी गेला. यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याला भोवळ आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे यांनी त्यास मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर तरुण हा तेथील रिक्षाचालक कैलास भाईदास पाटील यांचा मुलगा असून तो पारोळा येथे द्वितीय वर्ष आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता.

Web Title: Dizzy and dying young man while giving fertilizer to the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.