डी.एल.एड प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:27 PM2020-09-02T19:27:03+5:302020-09-02T19:27:13+5:30
जळगाव : डी.एल.एड आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीचे वेळापत्रक नुकतेच विद्या प्राधिकरण संचालकांनी जाहीर केले आहे़ त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ सप्टेंबरपर्यंत ...
जळगाव : डी.एल.एड आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीचे वेळापत्रक नुकतेच विद्या प्राधिकरण संचालकांनी जाहीर केले आहे़ त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
डी़एल़एड़ प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १७ आॅगस्टपासून प्रारंभ झाली आहे़ विद्यार्थ्यांना आता आॅनलाईन प्रवेश फॉर्म भरल्यानंतर कोविड प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे आॅनलाईन पध्दतीने पडताळणी होणार असून पालक व विद्यार्थ्यांनी कार्यालयात गर्दी करु नये, तसे आपणास एस.एम.एस व्दारे कळविण्यात येईल, अशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी दिली आहे.
असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
विद्यार्थ्यांना १७ आॅगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे़ डाएटस्तरावर पूर्ण भरलेल्या आवेदनपत्राची आॅनलाईन पडताळणी १७ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर करता येईल़ तसेच हरकत मेरिट लिस्ट १० सप्टेंब रोजी प्रसिध्द होईल़ त्यानंतर पूर्ण भरलेल्या अजार्ची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर १३ रोजी प्रसिध्द होईल़ त्याआधी ४ सप्टेंबर रोजी प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहिर होईल़ नंतर १४ ते १७ सप्टेंबरपर्यंत प्रथम फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे़ २० सप्टेंब रोजी दुसरी प्रवेश फेरी यादी जाहीर होईल़ २१ ते २४ सप्टेंबरपर्यंत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचे आहे़ तिसरी व अंतिम प्रवेश फेरी यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द होईल़ २८ सप्टेंबर ते १ आॅक्टोंबर पर्यंत तिसऱ्या प्रवेश फेरीतील उमेदवारानी प्रवेश घ्यावयाचे आहे़ त्याचबरोबर २५ सप्टेंबरपासून प्रथम वर्षाला सुरूवात होणार आहे.