माहिती आणत नाही, मग बैठकीस येता कशाला ? : जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:14 PM2019-04-27T12:14:19+5:302019-04-27T12:14:48+5:30
शेतकऱ्यांकडून कृषीपंपासाठी पैसे घेतल्यास गुन्हे दाखल करणार
जळगाव : बैठकीत केवळ आकडेवारी न देता कृषी विकासासाठी पूरक माहिती उपलब्ध होणे आवश्यक असताना ती उपलब्ध का होत नाही तर बैठकीला येता कशाला, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कृषी विभागासह भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाºयांची कानउघडणी केली. सोबतच कृषी पंपासाठी शेतकºयांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी वाढत असल्याने असे प्रकार घडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशाराही जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी दिला.
जिल्हाधिकारी कार्याल्याच्या नियोजन सभागृहात शुक्रवारी खरीप हंगाम २०१८-२०१९चा आढावा व खरीप हंगाम २०१९-२०२० नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आढावा घेताना अनेक विषयांवर खंत व्यक्त करीत अधिकाºयांची कानउघडणी केली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा अग्रणी बॅकेचे अधिकारी अरुण प्रकाश, नाबार्डचे श्रीकांत जांभरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस.आर. बेडिस, भूजल सर्वेक्षण विभागाचे व्ही.एस. जवांजळ, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस.बी. भालशंकर उपस्थित होते.
या वेळी संभाजी ठाकूर हे माहिती देत असताना जिल्हाधिकाºयांना त्यांना रोखत केवळ आकडेवारी नको, शेतकºयांना कमी पावसातही काय करता येऊ शकते, त्यांना कसा फायदा होऊ शकेल, या बाबत माहिती द्या, असे सांगितले. शेतकºयांसाठी विस्तार कार्य थंडावले असल्याने खंत व्यक्त करीत त्याला गती देणे आवश्यक असल्याचे डॉ. ढाकणे म्हणाले. सोबतच कमी पावसामुळे भूजल पातळीसंदर्भात माहिती विचारली असता व्ही.एस. जवांजळ यांना माहिती देता आली नाही. त्यावर जिल्हाधिकाºयांनी माहिती नाही तर बैठकीला येता कशाला, असा प्रश्न त्यांना विचारला.
शेतकºयांच्या वाढत्या तक्रारी
आधीच अडचणीत असलेल्या शेतकºयांकडून कृषी पंपाच्या वीज पुरवठ्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी शेतकºयांकडून पैसे घेत जात असल्याच्या तक्रारी असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहचली. त्यामुळे असे प्रकार घडल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देत जिल्हाधिकाºयांनी एस.बी. भालशंकर यांना धारेवर धरले.
कमी पाण्यात दुप्पट उत्पादनासाठी प्रयत्न करा
जिल्ह्यासाठी कृषी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने कमी पाण्यात शेतकºयांना दुप्पट उत्पादन मिळेल अशा पिकांचे बियाणे, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करुन शेतकºयांना शाश्वत शेतीसाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या. ते म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाने आराखडा तयार करताना बाजार पेठेचे विश्लेषण करुन कोणत्या काळात कोणते पीक घेतल्यास शेतकºयांना चांगला लाभ होईल याचा विचार करावा, यामुळे जिल्ह्यातील पीक पध्दती बदलण्यास मदत होवून शेतकºयांना चांगला मोबदला मिळेल. शेतकºयाने शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुधनाचा वापर करुन दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपला विकास साधावा असेही, डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
कापसाबरोबर कडधान्यावर भर द्या
गेल्या दोन तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे तसेच कपाशी सारख्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकºयांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नवनवीन संशोधनाचा वापर करुन कमी पावसात चांगले उत्पादन कसे येईल अशा पिकांचे संशोधन करुन शेतकºयांना कापसाबरोबर मका, ज्वारी, बाजरी, मुग, उडीद असे कमी पावसात येणारे पिके घेण्यासाठी शेतकºयांना प्रवृत्त करावे लागेल असेही यावेळी सांगण्यात आले.
कृषी अवजारांबाबत प्रशिक्षण
काही शेतकरी शेतमजूर मिळत नसल्यामुळे शेती करत नाहीत, यासाठी कृषी विभागाने तालुका पातळीवर वेगवेगळे कृषी अवजारे बनविणाºया नामांकित कंपन्यांना आमंत्रित करुन कृषी प्रदर्शनाचे आयोजन करुन अशा प्रदर्शनात शेतकºयांना कृषी अवजारांचा वापर कसा करावा याबाबत आधुनिक प्रशिक्षण मिळेल, असेही डॉ.ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
शेतकºयांच्या विद्युतपंपाचा विम्याबाबत चर्चा
वीज कंपनी संदर्भात शेतकरी वारंवार जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी घेवून येतात. विज येते-जाते यामुळे अनेक शेतकºयांची विहिरीवरील पंप जळतात. त्यासाठी विद्युत विभागातर्फे शेतकºयांच्या विद्युतपंपाचा विमा करुन घेता येईल का याबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली. वीज कंपनीने शेतकºयांना सिंचनासाठी लागणारी वीज वेळेवर उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.
प्रत्येक तालुक्यातून सामूहिक गटशेती विकसित करा
जिल्ल्ह्यातील १५ तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा प्रत्येक तालुक्यातून एक सामूहिक गट निवडून त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या वेगवेगळ््या योजनांमधून निधी उपलब्ध करुन जिल्हयात १ हजार ५०० हेक्टर सामूहिक गटशेती विकसित झाली पाहिजे तसेच जिल्ह्यात शेडनेट शेतीस चालणा देण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
शेतकºयांना बँकांनी तत्काळ पतपुरवठा करावा
जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. पाण्याची कमरता पाहता नागरिकांनी पाण्याचा अतिशय काटकसरीने आणि जपून वापर करावा. शेतकºयांंनी आगामी काळात कमी पाण्यात येणारी पिके घ्यावीत, आगामी खरीप हंगामासाठी शेतकºयांना बँकांनी तत्काळ पतपुरवठा करावा, कपाशीवरील बोंड अळी, मकावरील अमेरिकन लष्कर अळी निर्मूलनासाठी शेतकºयांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
८ लाख १० हजार २०९ हेक्टरवर होणार लागवड
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी सांगितले की, २०१९-२०२०साठी जळगाव जिल्ल्ह्यात ८ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयुक्त असून ८ लाख १० हजार २०९ हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात येणार आहे. खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, कापूस , तूर, मुग, उडीद, भूईमुग, सोयाबीन, सूर्यफुल, ऊस, केळी इत्यादी पिके घेतली जातात. खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या ४२ हजार ६७५ क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले असून कापसाच्या बियाण्याच्या २५ लाख पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तसेच ३ लाख ३२ हजार टन मे.टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रक्रिया उद्योगाला चालणा शक्य
शेवटी कृषी विभागाच्या नियोजनाबाबत माहिती देताना अनिल भोकरे यांनी होणाºया पावसावर कसे उत्पन्न घेता येईल, कमी खर्चाचे नियोजन, प्रक्रिया उद्योगाला चालणा देणे, ११०० शेती शाळा सुरू करणे इत्यादी मुद्यांबाबत माहिती दिली.
सूत्रसंचालन काविरी राजपूत यांनी केले तर कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी आभार मानले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
आचार संहितेमुळे राजकीय मंडळींव्यतिरिक्त बैठक
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शुक्रवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठकीस राजकीय मंडळी उपस्थित नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या उपस्थित ही बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर विभागीय बैठक होणार आहे.