चॉकलेट नको, चिल्लर घ्या..
By admin | Published: March 26, 2017 05:48 PM2017-03-26T17:48:26+5:302017-03-26T17:48:26+5:30
एकता रिटेल किराणा र्मचट पतसंस्थेकडून आतार्पयत 25 पेक्षा जास्त ‘चिल्लर मेळावे’ घेत सुमारे तीन कोटी रुपयांच्या चिल्लरचे व्यापा:यांना वाटप केले आहे.
Next
10 लाखांच्या चिल्लरचे सोमवारी वाटप : एकता रिटेल पतसंस्थेने केली 3 कोटींची चिल्लर वाटप
लोकमत ऑनलाईन विशेष
जळगाव, दि.26 - बाजारातील सुटय़ा नाण्यांची टंचाई आणि त्यातून खरेदी-विक्रीच्या दरम्यान होणारे वाद टाळण्यासाठी जळगावातील एकता रिटेल किराणा र्मचट पतसंस्थेकडून आतार्पयत 25 पेक्षा जास्त ‘चिल्लर मेळावे’ घेत सुमारे तीन कोटी रुपयांच्या चिल्लरचे वाटप केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. या काळात ग्राहकांच्या बँकेतील व्यवहारांवर मर्यादा आल्याने बाजारात मोठय़ा प्रमाणात चलन टंचाई निर्माण झाली. त्यातून वादाचे प्रसंग निर्माण होऊ लागले. या पाश्र्वभूमीवर पतसंस्थेने ग्राहकांसाठी कार्यक्रम स्वरुपात चिल्लर मेळावा घेण्याचा उपक्रम सुरु केला.
नोट बंदीच्या काळात 25 लाखांची चिल्लर वाटप
बाजारातील चलन टंचाईची स्थिती पाहता संस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया यांनी रिझव्र्ह बँकेसोबत पत्रव्यवहार करून चिल्लर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पतसंस्थेच्या मागणीनुसार एक, दोन, पाच व दहा रुपयांचे नाणे रिझव्र्ह बँकेने उपलब्ध करून दिले. पतसंस्थेने व्यापा:यांसाठी चिल्लर मेळावा घेत वाटप केले. नोटबंदीच्या काळात घेतलेल्या मेळाव्यात 25 लाखांच्या चिल्लरचे वाटप पतसंस्थेने केले.
आता ग्राहकांना मिळणार चिल्लर
एकता रिटेल र्मचट पतसंस्था ही व्यापा:यांची संस्था आहे. 725 व्यापारी यात सभासद आहेत. सुटय़ा पैशांवरून ग्राहक व व्यापा:यांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी पतसंस्थेने चिल्लर मेळाव्याची संकल्पना राबविली. मेळाव्याचा ग्राहकांना देखील लाभ व्हावा यासाठी पाच हजार रुपयांर्पयतची चिल्लर ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यात 1, 2, 5 व 10 रुपयांच्या नाण्यांचे पॅकेट तयार केले आहे. सोमवार 27 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान ग्राहक व व्यापा:यांना 10 लाखांच्या चिल्लर वाटप होणार आहे.
चिल्लर सोबत ‘फ्रेश नोटा मेळावा’
पुजा, धार्मिक विधी व लग्नसमारंभात वापर होणा:या 10, 20, 50 व 100 रुपयांच्या को:या करकरीत नोटांच्या वितरणाचा मेळावे देखील पतसंस्थेने घेतले आहे. चिल्लर व फ्रेश नोटा मेळावा ही खर्चिक बाब आहे. जितक्या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे ती रक्कम सुरुवातीला बँकेत जमा करावी लागते. त्यामुळे पतसंस्था किंवा बँक असे मेळावे घेण्यासाठी नाखुश असतात. मात्र एकता रिटेल पतसंस्थेने व्यापारी व ग्राहकांच्या हितासाठी हे मेळावे घेण्यास अध्यक्ष ललित बरडिया, उपाध्यक्ष घन:श्याम अडवाणी व सीईओ प्रणिता कोलते यांनी सुरुवात केली.
चॉकलेट नको आता चिल्लर घ्या
शॉपिंग मॉल, किराणा दुकान, मेडिकल, जनरल स्टोअर्स किंवा अन्य ठिकाणी खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून ग्राहकांना सुटे पैसे नसल्याचे सांगत चॉकलेट देण्यात येते. चॉकलेट देण्यावरून अनेक वेळा वादाचे प्रसंग देखील होत असतात. मात्र आता ग्राहकांनी वादाचे प्रसंग टाळण्यासाठी व व्यापा:यांकडून चॉकलेट न घेता मेळाव्यातून चिल्लर घ्यावी असा संदेश पतसंस्थेकडून देण्यात येत आहे.
बाजारातील चलन टंचाई दूर व्हावी यासाठी आमच्या पतसंस्थेतर्फे व्यापा:यांना चिल्लर वाटप केली जात होती. मात्र आता ग्राहकांना देखील पाच हजार रुपयांर्पयतची चिल्लर वितरीत करण्यात येणार आहे.
ललित बरडिया, अध्यक्ष, एकता रिटेल किराणा र्मचट पतसंस्था, जळगाव.