जिल्ह्यासाठी मंजूर प्रकल्प इतरत्र वळवू नका

By admin | Published: January 6, 2017 12:40 AM2017-01-06T00:40:59+5:302017-01-06T00:40:59+5:30

एकनाथराव खडसे : जिल्ह्यावर होणारा अन्याय पालकमंत्र्यांनी दूर करावा

Do not divert the project approved for the district | जिल्ह्यासाठी मंजूर प्रकल्प इतरत्र वळवू नका

जिल्ह्यासाठी मंजूर प्रकल्प इतरत्र वळवू नका

Next

जळगाव : मी मंत्री असताना जिल्ह्यासाठी मंजूर केलेले प्रकल्प एक-एक करीत जिल्ह्याबाहेर वळविले जात आहेत. जिल्ह्यावर होणारा हा अन्याय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूर करावा, मंत्रीमंडळात त्यांचा चांगला प्रभाव आहे, अशी अपेक्षा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी दुपारी भाजपा कार्यालयात आयोजित बैठकीत व्यक्त केली.
व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी. पाटील, रक्षा खडसे, माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, स्मिता वाघ, सुरेश भोळे, उन्मेष पाटील, चंदूलाल पटेल, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, किशोर काळकर उपस्थित होते.
जि.प. निवडणुकीच्या यशाचा संकल्प करू या
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचा पहिलाच जळगाव दौरा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविण्याचा संकल्प यानिमित्ताने करू या, असे आवाहन केले. विधानसभेमध्ये आपण बहुमतात आहोत, मात्र विधानपरिषदेत अल्पमतात असल्याने पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपाने ताब्यात घेण्यासाठी कार्यकत्र्यानी परिश्रम घ्यावे, असे आवाहनही खडसे यांनी केले.
सत्ता आहे म्हणून भ्रमात राहू नका
गेल्या 20 वर्षापासून आपण जि.प.मध्ये सत्तेत आहोत. त्यामुळे यावेळी आपल्याला यश मिळेल या भ्रमात राहू नका, असा सल्ला खडसे यांनी कार्यकत्र्याना दिला. गेल्या निवडणुकीत मुक्ताईनगर तालुक्यातील काही जागा मोजक्या मतांनी आपल्या हातून गेल्या होत्या. सध्या वातावरण चांगले आहे. पण ही बाब प्रत्यक्ष मतदानात उतरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गळ्यात फक्त पटका घालून यश मिळणार नाही
आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुका जिंकायच्या असल्यास केवळ गळ्यात भाजपाचा पटका घालून चालणार नाही. त्यासाठी कठोर श्रम करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.  सत्ता आल्यानंतर सत्तेची नशा येऊ देऊ नका. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये वर्षानुवर्षे भाजपा सत्तेत आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने काम केले जात आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यानंतर महाराष्ट्रातदेखील चांगले काम करून पुन्हा सत्तेत यायचे आहे.
सत्ता सामान्य माणसासाठी
नागरिकांनी आपल्या निवडून दिले आहे ते राजकीय पद भूषविण्यासाठी नाही तर सामान्य माणसाला मदत करण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक नेत्याने किमान एक हजार लोकांचे कामे करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विधानपरिषदेत बहुमताच्या जवळ
विधानसभेमध्ये भाजपा व शिवसेना बहुमतात आहे. मात्र ज्या ठिकाणी कायदे केले जातात त्या ठिकाणी आपण अल्पमतात आहोत. सन 2018 मध्ये बहुतांश जागा रिक्त होणार आहे. मात्र आपल्याला इतका वेळ थांबायचे नाही. सध्या विधानपरिषदेत सहयोगी सदस्यांसह आपले 32 संख्याबळ आहे, तर बहुमतासाठी 37 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
देश बदलविण्यासाठी मोदींनी एक संधी मागितली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश बदलविण्यासाठी एक संधी मागितली. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आज देश बदलत आहे. त्यांनी शेतकरी, शेतमजूर व गृहिणी यांच्यासाठी सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेमुळे तीन पिढय़ा सुरक्षित झाल्या आहेत. तर देशभरात 5 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याच्या उपक्रमामुळे अनेक महिलांची काळजी घेतली आहे.
मागास आयोगाची घोषणा
राज्य शासनाच्या काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत बार्टीच्या धर्तीवर ‘सारथी’ या संशोधन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मराठा समाजातील चालीरीती, त्यांचे व्यवसाय याबाबत संशोधन करण्यात येणार आहे. यासह मागास आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासन जे लोकहिताचे निर्णय घेत आहेत ते निर्णय सर्वसामान्य नागरिकांर्पयत पोहचविणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.सुनील नेवे यांनी केले. प्रारंभी पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा भाजपातर्फे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी नगरपालिका निवडणुकीतील भाजपाने मिळविलेले यश आणि आगामी  जिल्हा परिषद व पंचायत                     समिती निवडणुकीतील पक्षाच्या कामकाजाची रचना याबाबतचा अहवाल सादर केला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्तेत मित्रपक्ष भागीदार राहिला. मात्र आता पांगळगाडी म्हणून मित्रपक्षाची साथ नको आहे. मित्रपक्षांनी सत्तेचे लोणी चाटले आणि भाजपाला मात्र आरोपीच्या पिंज:यात बसविल्याचा आरोप त्यांनी प्रास्ताविकात केला. त्यानंतर तालुकानिहाय मंडळ अध्यक्षांनी पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी तसेच जि.प. व पं.स. निवडणुकीची तयारी याबाबत माहिती दिली. यावेळी नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.


पक्षाने अनेकांना मोठे केले आहे. ज्यांना पक्षाची माहिती नाही त्यांनादेखील संधी दिली आहे. या सा:यात पक्ष वाढला पाहिजे हा उद्देश होता. पक्ष वाढवित असताना अन्य पक्षांच्या उमेदवारांना पक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र याचा अर्थ कारागृहातून सुटून आलेला किंवा चोर व गुंडांना पक्षात घ्या, असा नाही.
..तर स्वबळाची तयारी करा
4जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगरपालिका निवडणुकीत आपण एकसंघ राहिल्याने यश मिळाल्याचे सांगितले. 20 वर्षापासून जि.प.मध्ये आपली सत्ता आहे. आता ही सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे. तालुकास्तरावर ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी युती करा. ज्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नसेल तेथे स्वबळाची तयारी करा, असेही महाजन म्हणाले.
1 चंद्रकांत पाटील यांच्यासाठी जळगाव हे माहेर आहे. माहेरी जास्त थांबू नका, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपण मंत्री असताना जिल्ह्यासाठी अनेक प्रकल्प मंजूर केले होते. मात्र ते          आता अन्य ठिकाणी वळविले जात आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी 98 कोटींचा निधी मंजूर केला होता.
2 अल्पसंख्याकांसाठी पॉलिटेक्निक कॉलेजचे काम रखडले आहे. हिंगोणे येथील टिश्यू कल्चर प्रकल्प अन्य ठिकाणी वळविण्याची तयारी सुरू आहे. कृषी विद्यापीठ जळगाव किंवा धुळे कोठेही करा, पण करा.
3 जिल्ह्यासाठी नवीन काही होईल की नाही माहिती नाही; मात्र जे प्रकल्प मंजूर आहे ते अन्य ठिकाणी वळवून जिल्ह्यावर जो अन्याय केला जात आहे तो थांबवावा, अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली.
40 जागांचे लक्ष्य
जिल्हा परिषदेत किमान 40 सदस्य भाजपाचे असतील या दृष्टीने प्रयत्न करावे, असे महाजन यांनी सांगितले. त्यासाठी एखादा बाहेरचा उमेदवार घेण्याची आवश्यकता असली तरी हरकत नाही. वारंवार पडलो असलो तरी मलाच उमेदवारी हवी हा विचार कार्यकत्र्यानी सोडावा. भाजपामध्ये येण्यासाठी अन्य पक्षातील अनेक लोक इच्छुक आहेत.
सत्तेत असल्यामुळे बोलण्यावर बंधन
खडसे म्हणाले, विरोधी पक्षात असताना विविध प्रश्नांवर सत्ताधा:यांना कोंडीत पकडण्यासाठी जोरदार हल्ला चढविता येत होता. मात्र आता केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार आहे. त्यामुळे बोलताना बंधन येते, असे त्यांनी सांगितले.
कार्यकत्र्यासाठी ताकद लावा
खडसे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते विजयासाठी शक्ती पणास लावतात. जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकत्र्याची निवडणूक आहे. त्यामुळे नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावावी. विरोधी पक्षात असताना जि.प.मध्ये सत्तेत होतो. आता केंद्र व राज्यात सत्ता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर               आहे.
नाथाभाऊ महाराष्ट्राचे पालक
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना महाराष्ट्राचे पालक म्हणून केली. आपण केवळ टाळ्या मिळविण्यासाठी नाही तर मनापासून हे बोलल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात भाजपा ज्या नेत्यांनी वाढविली त्यात एकनाथराव खडसे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यावर आमची श्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
1980 मध्ये विद्यार्थी परिषदेचे काम करण्यासाठी जळगावात आलो होतो. जिल्ह्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे आज पुन्हा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो आहे. जिल्ह्यातून अन्य ठिकाणी प्रकल्प वळविले जात असल्याचे खडसे यांनी आपल्या भाषणात सांगितले. या मुद्यांची माहिती घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
 

Web Title: Do not divert the project approved for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.