निवडणूक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांची हयगय नाही - विभागीय आयुक्त राजाराम माने यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:23 PM2018-09-29T12:23:58+5:302018-09-29T12:24:42+5:30

दोन ठिकाणी नाव असणाºयांना नोटीस

Do not fall prey to negligence in electioneering - Divisional Commissioner Rajaram Mane's sign | निवडणूक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांची हयगय नाही - विभागीय आयुक्त राजाराम माने यांचा इशारा

निवडणूक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांची हयगय नाही - विभागीय आयुक्त राजाराम माने यांचा इशारा

Next
ठळक मुद्दे खुलासा आल्यानंतर एका ठिकाणचे नाव रद्द करण्यात येणारजि.प.च्या कामात सुधारणा आवश्यक

जळगाव : मतदार नाव नोंदणी कार्यक्रमात बीएलओंकडून हलगर्जीपणा होत असेल किंवा निवडणूक कामात कोणताही निष्काळजीपणा केला जात असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन ठिकाणी नाव असणा-यांना नोटीस
ग्रामीण भागासह शहरात अशा दोन ठिकाणी मतदरांच्या नावाबाबत विचारले असता, माने म्हणाले की, जिल्ह्यात २ लाख ६५ हजार मतदारांचे शहर व ग्रामीण भागात असे दोन ठिकाणी नावे आढळून आले असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांचा खुलासा आल्यानंतर एका ठिकाणचे नाव रद्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
जि.प.च्या कामात सुधारणा आवश्यक
जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण कामात चांगले काम होत असले तरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कामात सुधारणा होणे गरजेचे असल्याचा उल्लेख माने यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी केला.
११ विधानसभा मतदार संघात १० जानेवारी २०१८ च्या अंतिम यादीनुसार ३२ लाख ९४ हजार ९४९, निरंतर मतदार नोंदणी प्रक्रीयेत समाविष्ट केलेले ४२ हजार ५५३, वगळणी केलेले ४४ हजार ३४५ मतदार असून मतदार संख्येत १ हजार ७९२ घट झाली आहे. त्यानुसार मतदार अर्हता दिनांकावर आधारीत संख्या ३२ लाख ९३ हजार १५७ आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरीता ७ हजार ४८८ बॅलेट युनिट, ४ हजार ३५४ कंट्रोल युनिट प्राप्त झाले असून त्यांची ४ आॅक्टोबरपासून तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Do not fall prey to negligence in electioneering - Divisional Commissioner Rajaram Mane's sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.