भांडणे नको, जनतेची कामे करा : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:58 PM2018-08-27T13:58:05+5:302018-08-27T13:59:49+5:30

जिल्हा परिषदेत अध्यक्ष तसेच पदाधिकाºयाचे आपसातील भांडण चव्हाटावर आल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्यांचे कान टोचण्याचे काम रविवारी केले.

Do not fight, do the masses: Girish Mahajan | भांडणे नको, जनतेची कामे करा : गिरीश महाजन

भांडणे नको, जनतेची कामे करा : गिरीश महाजन

Next
ठळक मुद्देगिरीश महाजनांनी टोचले कानठेकेदार अधिकाऱ्यांचे होणार ‘आॅपरेशन’कारवाईकडे लागले सर्वांचेच लक्ष

जळगाव : जिल्हा परिषदेत अध्यक्ष तसेच पदाधिकाºयाचे आपसातील भांडण चव्हाटावर आल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्यांचे कान टोचण्याचे काम रविवारी केले. आपसात भांडणे करण्यापेक्षा जनतेची कामे करा, निधी कमी पडल्यास शासनाकडून तो मिळवून देणार असेही आश्वासन त्यांनी दिले. याचबरोबर जिल्हा परिषदेत ठेकेदारी करणाºया अधिकाºयांची उचलबांगडी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असून गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यातील बेबनाव वेळोवेळी पुढे येत गेला. आपसातील वादामुळे विकास कामांवरही परिणाम होत राहिला. यात काही सदस्यही आपसात वाद घालण्यात मागे राहिले नाही. यामुळे अधिकारी वर्गासही फावले. काहींनी आपली मनमानी सुरु केली. या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांंनी या पदाधिकाºयांची बैठक जि.प.अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या निवासस्थानी सायंकाळी घेतली.
यावेळी जि.प.अध्यक्ष उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण यांचेसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व काही पदाधिकारी उपस्थित होते.
कारवाईकडे लागले सर्वांचेच लक्ष
गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाºयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे पुढे कोणला काय फटका बसतो, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.
अधिकाºयांवर अंकुश राहिलेला नाही
पदाधिकाºयांच्या आपसातील वादामुळे जिल्हा परिषदेतील अधिकाºयांवर कोणाचा अंकुश राहिलेला नाही. काही अधिकारी ठेकेदारी करीत आहेत. याचबरोबर मनमानी कारभारही वाढला आहे. काहींनी तर शौचालयाच्या कामांचेही ठेके घेतले असून काही अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याचेही महाजन म्हणाले. यामुळे आपल्यालच आता लक्ष घालावे लागणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेत ‘विशेष सर्जरी’ मोहीम आपण राबविणार असून अधिकाºयांशी लवकरच चर्चा करणार आहे. काहीची बदल तर काहींची खांदेपालट करावी लागेल, असे संकेतही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

Web Title: Do not fight, do the masses: Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.