लाखोंच्या सौंदर्य प्रसाधनावर डल्ला

By Admin | Published: January 6, 2017 12:37 AM2017-01-06T00:37:23+5:302017-01-06T00:37:23+5:30

पोलिसांचा धाक संपला : बंदिस्त मार्केटमध्ये होणा:या चो:यांनी आश्चर्य, गस्त ठरतेय नावालाच

Do not forget about the beauty of millions | लाखोंच्या सौंदर्य प्रसाधनावर डल्ला

लाखोंच्या सौंदर्य प्रसाधनावर डल्ला

googlenewsNext

भुसावळ : शहरात चोरटय़ांचा उच्छाद कायम असून आठवडाभरात बंदिस्त मार्केटमध्ये चौथे दुकान फुटल्याने व्यावसायिकांमध्ये मोठी घबराट पसरली आह़े पोलिसांची गस्त तोकडी ठरत असून चोरटे शिरजोर झाल्याचे चित्र आह़े शहरातील चुडी मार्केटमधील जनरल स्टोअर्स फोडून चोरटय़ांनी सौंदर्य प्रसाधनांसह लाखोंचे साहित्य लांबवल़े
विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्ही नसलेले व बंदीस्त मार्केटची दिवसा ेटेहळणी करीत असून रात्री काम फत्ते करीत आहेत़
बंदीस्त मार्केटमध्ये चोरी
शहरातील शहिद अब्दुल हमीद चुडी मार्केटमधील सय्यद सादीक सैय्यद हारुण यांच्या मालकीचे पाकिजा दुल्हन बँगल्स जनरल स्टोअर्स गुरुवारी मध्यरात्री चोरटय़ांनी फोडल़े हे मार्केट बंदिस्त असतानाही चोरटय़ांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून प्रवेश करीत दुकानाचे कुलूपे तोडली़
दुकानातील  20 हजारांची रोकड, चायना मोबाईल, ब्लू टुथ स्पीकर, डिओ, श्ॉम्पु, व्हॅसलीन, ज्वेलरी डायमंड सेट तसेच महागडा दुल्हन साज, डायमंड बांगडय़ा तसेच महागडी सौंदर्य प्रसाधने मिळून एकूण एक लाख 70 हजारांचा ऐवज लांबवल्याचे दुकानदाराने सांगितल़े
गुरुवारी सकाळी स्वच्छता कर्मचारी चुडी मार्केटची स्वच्छता करीत असताना त्यास चोरी झाल्याचे लक्षात आल्याने दुकान मालकास कळवण्यात आल़े बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे व डीबी कर्मचा:यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली़
सीसीटीव्ही नसलेले मार्केट टार्गेट
शहरात आतार्पयत झालेल्या चो:यांमध्ये सीसीटीव्ही नसलेल्या व्यापारी संकुलांना चोरटय़ांनी टार्गेट केले आह़े व्यापारी लाखो रुपयांच्या गाळ्यांमध्ये सीसीटीव्ही बसवत नसल्याने चोरटय़ांना आयतेच कोलीत मिळत आह़े पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांसह व्यापा:यांकडून होत आह़े
पंधरवडय़ात चार दुकानांसह एक घरफोडी
4नववर्षाच्या प्रारंभीच चोरटय़ांनी छबीलदास मार्केटमधील तीन दुकाने फोडून थर्डीफस्ट साजरा केला होता़  चोरटय़ांनी श्रीचंद भागचंद बोगीया यांच्या राधाकृष्ण होजिअरी दुकानाचे कुलूप तोडून सुमारे 300 रुपयांची चिल्लर तसेच एक हजारार्पयतची रोकड तसेच पहेलाज मूलचंदानी यांच्या रुपचंद गुरुबक्षमल क्लॉथ स्टोअर्समध्येही चोरटय़ांनी आठ हजारांची रोकड लांबवली तर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळील रवी उत्तमचंदानी यांच्या राजयोग ब्युटी कलेक्शनचे कुलूप  चोरटय़ांनी तोडले मात्र काहीही ऐवज चोरीला गेला नाही, असे दुकानदाराने सांगितल़े
4शहरातील नेब कॉलनीतील रहिवासी महेंद्र बाबूलाल जैन हे राजेश्वर नगरातील भावाकडे कुटुंबासह शुक्रवार, 23 डिसेंबर रोजी जेवायला जाताच चोरटय़ांनी घरफोडी करीत  85 हजारांची रोकड, एक किलो चांदी, सोन्याचे शिक्क्यांसह एक लाख 62 हजारांचा ऐवज लांबवला होता़
पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह !
4शहर, बाजारपेठ हद्दीत सुरू असलेल्या चो:या, घरफोडीनंतर पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आह़े पोलिसांची गस्त तोकडी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आह़े
4जंक्शन स्थानक असल्याने शेकडो गाडय़ांमुळे चोरटे रात्रीतून येवून काम फत्ते करून निघून जातात़ पोलिसांना मात्र त्याची साधी भनकही लागत नाही़ वाढत्या चो:यांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून व्यापारी, व्यावसायिकदेखील धास्तावले आहेत़
वाढत्या चो:यांच्या पाश्र्वभूमीवर गस्त वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत़ चोरटे बहुधा बाहेरील असावेत़ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तसेच संशयीतांची माहिती काढून चोरटय़ा उघडकीस आणण्यात येतील़
-नीलोत्पल,
सहाय्यक पोलीस अधीक्षक, भुसावळ
 

Web Title: Do not forget about the beauty of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.