फुली और फुल के चक्कर मे भुल ना करे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 07:21 PM2018-08-02T19:21:46+5:302018-08-02T19:23:41+5:30
मनपा निवडणुकीबाबत वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी किस्से,चारोळ्या व पोस्ट यांनी सोशल मीडियावर धमाल सुरु आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यावर भाष्य करणाऱ्या पोस्टमुळे नेटक-यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
जळगाव : मनपा निवडणुकीबाबत वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी किस्से,चारोळ्या व पोस्ट यांनी सोशल मीडियावर धमाल सुरु आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यावर भाष्य करणाऱ्या पोस्टमुळे नेटक-यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
मनपा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर गुरुवारी उमेदवार व कार्यकर्त्यांनी दिवसभर विश्रांती घेतली. सकाळपासून सोशल मीडियावर धमाल संदेश सुरु झाले.
मतदान म्हटले की कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असतो. ज्याच्याकडे कार्यकर्त्यांची फौज जास्त त्याच्या विजयाचे गणित सोपे होत असते. त्यामुळेच मतदारांना पैसे वाटपापासून ते त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यावर सोपविली जाते. मतदानाच्या दिवशी वृद्ध, अंध, अपंग, महिला, पुरुष यांना वाहनामध्ये बसवून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची कसरत वाहनांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी केली. कधी नव्हे तो मतदारांचा होणारा सन्मान पाहून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली.
‘फुली और फुल के चक्कर मे पडकर भूल ना करे
अपना मतदान अवश्य करे, सही व्यक्ती को करे’
केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची रणनिती त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जळगाव महापालिका निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यातील संवाद व फोटो व्हायरल झाले आहेत.
भारतीय व अमेरिकेतील राजकारणाची तुलना करणारी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एकेकाळी जगावर राज्य करणा-या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे सद्यस्थितीचे जीवन आणि राजकारणापासून असणारी अलिप्तता याची पोस्ट व फोटो व्हायरल झाला आहे.