साहित्य संमेलनासाठी तुटपुंजे अनुदान नको, शाश्वत निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:46 AM2018-08-13T00:46:11+5:302018-08-13T00:46:41+5:30

चाळीसगाव येथे प्रकट मुलाखतीत डॉ.श्रीपाद जोशी यांची अपेक्षा

Do not give alot of grants for literature gathering, give sustainable funding | साहित्य संमेलनासाठी तुटपुंजे अनुदान नको, शाश्वत निधी द्या

साहित्य संमेलनासाठी तुटपुंजे अनुदान नको, शाश्वत निधी द्या

Next




चाळीसगाव, जि.जळगाव : एकीकडे तुटपुंजे अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे साहित्य महामंडळाची माहितीही मागायची, ही दुटप्पी भूमिका असून, महामंडळाला शाश्वत निधी द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी डॉ. श्रीपाद जोशी यांनी येथे केली.
चाळीसगाव येथील महाराष्ट साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे वाणी मंगल कार्यालयात शनिवारी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप होते. व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, विश्वस्त डॉ. सुनील राजपूत उपस्थित होते.
मराठी माणसाने भाषा, साहित्य, संस्कृती राक्षणासाठी खिशातून पैसे काढावे, जोपर्यंत हे होत नाही, तोवर शासनाकडे निधी मागण्यासाठी पदर पसरवाच लागेल, अशी खंतही डॉ. जोशी त्यांनी बोलून दाखवली. अशोक वाबळे आणि प्रा. तुषार चव्हाण यांनी विविधांगी प्रश्नांची मांडणी करुन डॉ.जोशी यांना बोलते केले.
बदल घडतोच. मात्र त्याची दिशा सकारात्मक असायला हवी, असे सांगत डॉ.जोशी यांनी गेल्या ५० वर्षात साहित्य महामंडळात जे काम झाले नाही, ते आपल्या अडीच वर्षाच्या काळात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोबिंवलीचे साहित्य संमेलन दर्दींच्या गदीर्ने यशस्वी झाले. संमेलनात युवा, स्त्रिया, दलित, आदिवासी यांना स्थान दिल्यानेच हे घडू शकले, असे ते म्हणाले. या वेळी किसनराव जोर्वेकर, अरुण भावसार, डॉ.विनोद कोतकर, उ.भ.काळे, जयसिंग बागुल, सुभाष कारवा, विजय पाटील, गणेश आढाव, अण्णा धुमाळ, अ‍ॅड. सुषमा पाटील, प्राचार्य पी.एस.चव्हाण, कवी गौतम निकम, मनोहर आंधळे, रमेश पोतदार, प्रतिभा बागुल, राकेश बोरसे, शालिग्राम निकम, रामचंद्र गोसावी, संगिता देव, बी.एल.ठाकरे आदी उपस्थित होते.
म्हणून निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला
साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचा वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला. त्यामुळेच निवडणुक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलनाच्या २० घटक संस्थांनी सुचविलेल्या २० नावांमधून एकाची अध्यक्षपदी निवड केली जाईल, असे डॉ. जोशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
मसापचे कार्य प्रागतिक झाले आहे. याचा दाखला देतानाच ज्याला डोकं नाही तो वाद घालणार नाही. वाद जरुर घाला. मात्र अगोदर वाद घालण्याइतके समृद्ध व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठीची होतेय कुचुंबणा
समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून साहित्याकडे पहावे, असे उद्बोधन करताना एका प्रश्नांच्या उत्तरात डॉ.जोशी यांनी मराठी भाषेच्या गळचेपी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ब्रिटीशकालिन शिक्षण पद्धतीमुळे मराठी भाषेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अमेरीका, इंग्लंड सारख्या देशांबरोबर शासन व्यवस्थेने करार केले आहेत. त्यामुळे इंग्रजीला प्राधान्य मिळते. मराठी भाषेची कुचंंबणा होते. एकट्या मुंबईत ३४ मराठी शाळा बंद पडल्या असून, हे दुर्देैवी आहे.

Web Title: Do not give alot of grants for literature gathering, give sustainable funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.