दाढय़ा वाढवू नये तर काय होईल ‘क्लीन शेव्हड्’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:42 PM2017-11-06T15:42:26+5:302017-11-06T15:42:46+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल सोनार यांनी लिहिलेला विशेष लेख ‘क्लीन शेव्हड्’

Do not increase the beard, what will happen if 'Clean Shevard' | दाढय़ा वाढवू नये तर काय होईल ‘क्लीन शेव्हड्’

दाढय़ा वाढवू नये तर काय होईल ‘क्लीन शेव्हड्’

Next

एखादा अपवाद सोडल्यास हिदूंचे सगळे देव ‘क्लीन शेव्हड्’ असतात. त्यामुळे एखाद्या सनातन्याने असे आवाहन केले की, ‘आपल्या धर्माचा अभिमान असणा:या सर्व हिंदू बांधवांनी दाढय़ा वाढवू नयेत तर काय होईल? मोठय़ा काळजीचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं, एक तरुण माङयासमोर उभं राहून मला विचारत होता, ‘सर, बघा, नी सांगा, मी थेट ‘छत्रीय कुलावतंस’ दिसतोय की नाही?’ त्याला ‘क्षत्रीय म्हणायचं असावं, पण छत्रपती ह्या शब्दाशी जवळीक साधायच्या सवयीमुळे बहुदा ‘क्ष’चा ‘छ’ झाला असावा. मी म्हणालो, की ‘बाबा रे, नाकेल्या माणसाने दाढी वाढवल्यामुळे तो शिवाजी झाला असता तर, आत्याबाईंना मिशा आल्यास आपण त्यांना मामा नसतो का म्हणालो?’ तो म्हणाला, ‘काही कळलं नाही सर.’ मी म्हणालो, ‘तू दाढी वाढवून आणि कपाळाला गंध लावल्यामुळे मलाही काहीच कळत नाहीये, की तू शिवसेनेचा, मनसेचा, संभाजी ब्रिगेडचा, की आणखी कुठला.’ ह्यावर तो म्हणाला, ‘छे मी त्यांच्यापैकी कोणीच नाही. बाबासाहेब पुरंदरेंच्या महानाटय़ात मी एका मावळ्याची भूमिका करतोय. मी चोपदार म्हणून दिसणार आहे.’ दाढी माणसाला कुठल्या कुठे नेऊन पोचवते, बघा. दाढीबद्दल पूर्वी आजसारखा घोळ होत नव्हता. दाढी वाढवणे आणि मुंबईत टॅक्सी व भारतभर ट्रक्स चालवणे हा सरदारजींचा जन्मसिद्ध व्यवसाय होता. ‘चोर के दाढी मे तिनका’ ह्या वाक्प्रचारामुळे सावध होऊन बहुतेक चोरांनी दाढय़ा वाढवणे सोडून दिले असावे. गुरू गो¨वंदसिंग, गुरूनानक, शिवाजी महाराज, रविंद्रनाथ टागोर इत्यादी थोरपुरुषांच्या दाढय़ांकडे पाहून. कोणाही ऐ:या गै:या नथ्थू खै:याची दाढी वाढवायची हिंमत होत नसावी. पण काळ बदलला. कोणी आपली बसलेली गालफडं झाकण्यासाठी दाढी वाढवू लागला, तर कोणी आध्यात्माची दुकाने थाटताना, आपण ऋषीतुल्य दिसावे म्हणून, वाढवलेली दाढी हीच आपली ओळख रुजवली. ज्या मध्यम वर्गीयांनी आयुष्यभर आपल्या निळ्या किंवा घा:या डोळ्यांची मोहिनी जपत, वयाच्या पन्नाशीर्पयत गुळगुळीत दाढी करण्याची सवय ठेवली, त्यांनीही, (चिंतन, मननाने येणारा गंभीर, भारदस्तपणा, मुळात नसताना, तो निदान ‘भासावा’ म्हणून, मानेवर रुळणा:या पांढ:या केशसंभारासह पांढरीशुभ्र दाढी वाढवणे सुरू केले. त्यामुळे ज्येष्ठत्व ‘सात्विक’ ‘वजनदार’ दिसायला मदत होऊ लागली. लोकांनी आपल्याला घाबरले पाहिजे अशी गरज राजकारणात निर्माण झाली आणि समस्त ‘कार्यकत्र्या’ जमातीने, चेहरा उग्र दिसावा म्हणून दाढय़ा वाढवायला सुरुवात केली. कपाळावरचा टिळा निळा असो की, शेंदरी, दाढीवाल्याला बघून पापभिरुंना घाम फुटणे महत्त्वाचे. आपण थोर कलंदर कलावंत नसलो तरी तसे दिसण्यासाठी अंगावर झब्बा, खांद्याला शबनम पिशवी आणि मुद्दाम अस्ताव्यस्त वाढू दिलेली दाढी राखणे हे कला क्षेत्रातील तरुणांमध्ये गरजेचे होऊन बसले. श्वेत श्याम चित्रपटाच्या जमान्यात नायिकेला वेषांतर करायचे असले की हमखास दाढी लावून सरदारजी बनवले जायचे. मग ती नलिनी जयवंत असो, की वैजयंती माला. ¨पंजारलेले केस आणि विस्कटलेली दाढी असल्याशिवाय त्या काळी कम्युनिस्ट पार्टीचं सभासदत्वच मिळायचं नाही, असं म्हणतात. ते तेव्हाचे दाढीवाले वेगळे आणि आत्ताचे वेगळे. आत्ताचे कसे? तर हे असे - झब्याविना कधीही नसतात दाढीवाले. दाढीतली मिशीही जपतात दाढीवाले. लावून गंध भाळी, नेत्री चमक निराळी, करणी मधेच काळी करतात दाढीवाले. अध्यात्म आणि धर्म, मनशांती आणि कर्म, लावून सेल जंगी, विकतात दाढीवाले. येता प्रसंग बाका, दावीत दोन्ही काखा, लावून पाय पाठी, पळतात दाढीवाले. नसता प्रताप अंगी, रांगेत शिवप्रभुंच्या, दाढीस दाखवोनी, घुसतात दाढीवाले. घालून छान कुरते, राखून फक्त दाढय़ा, प्रतिभेविना कलेला, छळतात दाढीवाले.

Web Title: Do not increase the beard, what will happen if 'Clean Shevard'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.