कोविड कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:55+5:302021-07-05T04:11:55+5:30

जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कोविड हंगामी, रोजंदारी कर्मचारी अर्थात हे सर्व कोरोनायोद्धे यांना शनिवारी अचानक कामावरून कमी करण्याचे आदेश दिल्याने ...

Do not leave the covid contract workers in the wind otherwise get on the road | कोविड कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा रस्त्यावर उतरू

कोविड कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा रस्त्यावर उतरू

Next

जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कोविड हंगामी, रोजंदारी कर्मचारी अर्थात हे सर्व कोरोनायोद्धे यांना शनिवारी अचानक कामावरून कमी करण्याचे आदेश दिल्याने हे सर्व ४५ कर्मचारी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे आपली समस्या मांडण्यासाठी खासदार जनसंपर्क कार्यालयात गेले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खासदार पाटील यांना दिले.

यावेळी खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव, डॉ. अर्चना पाटील, आरोग्य संचालक यांना दूरध्वनीवर संपर्क करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे मांडले. रात्रंदिवस सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या मानवी अधिकाराचे संरक्षण करत त्यांना वेगवेगळ्या आयुष्यमान भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच आरोग्य इतर विभागात समावेश करून घ्यावा, अशी सूचना खासदार पाटील यांनी राज्य सरकारकडे मांडली आहे.

यावेळी कंत्राटी कामगारांनी आपले म्हणणे मांडले. अनेक महिला कर्मचाऱ्यांना यावेळी रडू कोसळले होते. यावेळी राहुल पवार, भूषण महाजन, चेतन गुडेकर, मनीषा बागुल, किशोर पाटील, द्वारका लव्हारे, सुवर्णा पवार, मोनिका पाडवी, आम्रपाली म्हसदे, कुंदन माळी, आशाबाई निकम, जयश्री जगदाळे, सोनाली गिरासे, सुनीता कोळी, पूनम जाधव, सुवर्णा मोरे, उज्ज्वला मोरे, योगेश्वरी ठोसरे, ज्योती दळवी, मिताली खेडकर, ललिता पावरा, शमीना इस्माईल, प्रज्ञा लोखंडे, भाग्यश्री जगताप, दीक्षा साळवे, नूतन साळवे, शुभम पाटील, धनंजय पाटील, प्रथमेश नवाळे, विनोद भोसले, वैभव पाटील, दीपक पगार, लक्ष्मण माने, निशांत नवाळे, अविनाश राठोड, धनंजय चव्हाण, प्रशांत कोर,सागर धनगर, संदीप पाटील, ईश्वर पिलोरे, सचिन पाटील, सागर पाटील, गोविंद पाटील, तेजस चौधरी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी-

जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी सामावून घ्यावे, यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री व संबंधित विभागांकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

Web Title: Do not leave the covid contract workers in the wind otherwise get on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.