जीवनात स्वप्न पाहणे थांबवू नका- अल्पना दुबे

By admin | Published: June 24, 2017 04:44 PM2017-06-24T16:44:42+5:302017-06-24T16:44:42+5:30

दीपस्तंभकडून स्पर्धा परीक्षा उत्तीर्णांचा सत्कार

Do not stop dreaming in life - Alpine Dubey | जीवनात स्वप्न पाहणे थांबवू नका- अल्पना दुबे

जीवनात स्वप्न पाहणे थांबवू नका- अल्पना दुबे

Next

 आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२४- माणवाने नेहमी स्वप्न पाहिली पाहिजेत. तसेच ती स्वप्न प्रत्यक्षात कसे साकार होतील यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे.  त्यासाठी स्वप्न पाहणे थांबवू नका असे प्रतिपादन युपीएससी परीक्षेत राज्यातून दुसºया क्रमाकांने  उत्तीर्ण होणाºया प्रज्ञाचक्षू अल्पना दुबे यांनी विद्यार्थ्यांना केले. 
दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे शनिवारी शहरातील कांताई सभागृहात महाराष्टÑ व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.एन.रामास्वामी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग,  मनपा आयुक्त जीवन सोनवणे उपस्थित होते.  
अल्पना दुबे म्हणाल्या की, युपीएससी परीक्षेसाठी नियोजनाची गरज  असते. परीक्षेसाठी जर व्यवस्थित नियोजन केले. तर यश नक्कीच मिळते. परीक्षेचा काळात अनेकदा उत्साह कमी करणाºया व्यक्ती देखील येतात. परीक्षा देत असताना असो वा जीवनाच्या परीक्षेत कधीही नकारात्मक विचारांना थारा देवू नका. नकारात्मक विचार मनात राहिले जर यश मिळणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
एका रात्रीत आयुष्यात अंधकार आला
अल्पना दुबे यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास मांडताना सांगितले की, दहावी पर्यंत इतर विद्यार्थ्यांसारखीच दृष्टी होती. मात्र दहावीत असताना अचानक एका रात्रीत डोके दुखायला लागले. त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर कायमची दृष्टी गेल्याचे कळले. त्या एका रात्रीत माझ्या आयुष्यात कायमचा अंधकार आला. त्यावेळी वाटले की सर्व काही संपले. मात्र या आघातातुन देखील मी स्व:ताला सावरु शकले, यासाठी त्यांनी भगवंताचे आभार मानले. त्यांच्या मनोगतावेळी अनेकाना अश्रू अनावर झाले होते. 

Web Title: Do not stop dreaming in life - Alpine Dubey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.