कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:18+5:302021-07-08T04:12:18+5:30

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या १५ महिन्यांपासून कोविडमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी पदावर शासकीय कर्मचारी स्वत:च्या जीवाची ...

Do not terminate the appointment of contract employees | कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती खंडित करू नका

कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती खंडित करू नका

Next

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,

गेल्या १५ महिन्यांपासून कोविडमध्ये

काम करणाऱ्या कंत्राटी पदावर शासकीय कर्मचारी स्वत:च्या जीवाची बाजी लावून पहिल्या व दुसऱ्या लाटेशी सामना करीत होते. तरी कर्मचाऱ्यांची कोविड १९मधील विशेष योगदानाबद्दल शासनाने दखल न घेता आम्हा कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे, असेही निवेदनात नमूद केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाखापेक्षा अधिक संख्येने कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. तरी आमच्या या कामाची त्वरित दखल घ्यावी व आम्हास सेवेत समाविष्ट करून घ्यावे. जेणेकरून आम्ही सर्व कर्मचारी तिसऱ्या लाटेसाठी उत्साहाने सज्ज राहू, असेही शेवटी निवेदनात नमूद केलेले आहे.

या निवेदनावर भडगाव रुग्णालयात कोविड १९मध्ये काम करणाऱ्या डाॅ. रोशनी महाजन, डाॅ. गोविंद पवार, शीतल अहिरे, रंगिला पावरा, सुनीता पाटील, कल्पना साळुंखे, रिना पवार, शीतल मोरे, वैशाली हैडींगे, तसेच वार्डबाॅय भावेश हाडपे, गौरव धनगर, अमोल निकम, कंचन मोरे, शुभम सिंहले, कमलेश, निखिल कासार, डाटा ऑपरेटर अतुल पगारे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Do not terminate the appointment of contract employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.