विषाची परीक्षा नको.... जळगाव जिल्हा परिषदेच्या भाजप सदस्यांचा ‘विंटर टुअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:43 PM2019-12-29T23:43:24+5:302019-12-29T23:44:03+5:30

राष्टÑवादीच्या महिला सदस्याची व्हीप घेण्यास ना

Do not want poison test .... BJP members of Jalgaon Zilla Parishad 'winter tour' | विषाची परीक्षा नको.... जळगाव जिल्हा परिषदेच्या भाजप सदस्यांचा ‘विंटर टुअर’

विषाची परीक्षा नको.... जळगाव जिल्हा परिषदेच्या भाजप सदस्यांचा ‘विंटर टुअर’

Next

जळगाव : जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप टाळण्यासाठी तसेच महाविकास आघाडीकडून होणाऱ्या दाव्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपलाही सदस्यांना अज्ञात स्थळी हलवावे लागले. रविवारी सुमारे २८ सदस्य कोल्हे हिल्स येथे थांबून होते़ सोमवारी सर्व सदस्य मिळून सहलीला रवाना होणार असल्याचे समजते़ भाजपचे काही सदस्य आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या एका सदस्याने केला आहे़
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी व काँग्रेसकडून बैठका घेण्यात आल्या.
बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज उपस्थित होते़ त्यांचा या प्रक्रियेतील वाढता सहभाग, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून होणाºया हालचाली, शिवाय मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेकडे जिल्ह्यातील महत्त्वाचे पद जाण्याची शक्यता बघता, भाजपनेही शनिवारी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या जळगावातील निवासस्थानी सर्व सदस्यांची बैठक बोलावली़ यानंतर लागलीच सर्व सदस्यांना रविवारी दुपारी अध्यक्षांच्याच निवासस्थानी सदस्यांना बोलविण्यात आले होते़ त्यात २८ सदस्य एकत्र आले मात्र, उर्वरित सदस्य येऊ शकले नाहीत ते सोमवारी सहभागी होणार आहेत, असे सूत्रांकडून समजते़ अध्यक्षांच्या निवासस्थानाहून काही खासगी काही शासकीय वाहनाने दुपारी कोल्हे हिल्सकडे रवाना झाले होते़ याठिकाणी हे सदस्य थांबून होते़ सोमवारी हे सदस्य पुढच्या प्रवासाला निघणार आहेत.
सूत्र खडसेंकडे मात्र महाजनांचे प्रतिनिधी लक्ष ठेवून
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या या निवडीची सर्व सुत्रे दिसत असली तरी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी मात्र या सर्व राजकीय घडमोडींवर लक्ष ठेवून आहेत़ शनिवारी अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक झाली यावेळी गिरीश महाजन यांची अनुपस्थिती होती मात्र, काही प्रतिनिधी पूर्ण वेळ बाहेर थांबून होते, यासह दुसºया दिवशीही त्यांनी भाजपच्या सदस्यांचा आढावा घेतला़
राष्ट्रवादीचे सदस्य रवाना...
राष्ट्रवादीने सर्व सदस्यांना व्हीप बजावला आहे़ शिवाय त्यांना सहलीला रवाना केले आहे़ यातील अमळनेरच्या एका महिला सदस्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविल्याने महाविकास आघाडीला धक्का मानला जाता होता़ त्यांनी व्हीप स्वीकारला नसल्याने तो त्यांच्या घरावर चिपकविण्यात आल्याचे समजते़ मात्र, या सदस्यांचीही मनधरणी सुरू असून त्या परततील असा दावा करण्यात आला आहे़ तिकडे काँग्रेसचे सदस्य मुंबईला असल्याची माहिती आहे़
विषाची परीक्षा नको
भाजपकडे बहुमत आहे, शिवाय भाजपचे सदस्य फुटणार नाहीच असा दावा पक्षाकडून होत असतानाही त्यांना सहलीला रवाना करण्यात आले़ राज्यात महाविकास आघाडी सत्ता असल्याने 'विषाची परीक्षा नको' म्हणून ही काळजी घेत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Do not want poison test .... BJP members of Jalgaon Zilla Parishad 'winter tour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव